भगवान शंकराच्या भक्तांसाठी महाशिवरात्र (Mahashivratri) हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. एकूणच हिंदू धर्मात महाशिवरात्रीचं विशेष महत्त्व आहे. शिव म्हणजेच शंकर रात्रीच्या एका प्रहरी विश्रांती घेतो असं मानलं जातं. शिवाच्या याच विश्रांती घेण्याच्या काळाला ‘महाशिवरात्री’ असं म्हटलं जातं. अर्थात पृथ्वीवरचं एक वर्ष म्हणजे स्वर्गलोकातला एक दिवस असं मानलं जातं. प्रत्येक महिन्यातल्या कृष्ण पक्षातल्या त्रयोदशीयुक्त चतुर्दशीला शिवरात्र असते; पण माघ महिन्यात येणाऱ्या शिवरात्रीला महाशिवरात्र म्हणतात. या दिवशी शंकराची आराधना, उपवास आणि प्रार्थना केली जाते. रात्रभर जागरण केलं जातं. दुसऱ्या दिवशी उपवास सोडला