मुंबई, 16 ऑगस्ट : श्रीकृष्ण जन्माष्टमी हा हिंदू धर्मातील सर्वात खास सणांपैकी एक आहे. दरवर्षी कृष्ण जन्माष्टमी सर्व घरांमध्ये मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. जन्माष्टमीच्या दिवशी घरे, मंदिरे आणि बाजार भगवान श्रीकृष्णाच्या मूर्ती आणि सुंदर तबकांनी सजवले जातात. कृष्ण जन्माष्टमीची तयारी अनेक दिवस आधीच घराघरांत सुरू होते. या दिवशी विविध प्रकारची मिठाई आणि पदार्थ बनवून श्रीकृष्णाला 56 प्रकारचे नैवेद्य अर्पण केले जातात. कृष्ण जन्माष्टमीला लहान मुलं आणि आई वडील खूप उत्सुक असतात. घरोघरी आणि शाळांमध्ये लहान मुलांना कृष्णा बनवले जाते. या जन्माष्टमीला काही सोप्या टिप्स वापरून तुम्हीही तुमच्या मुलांना कृष्णाप्रमाणे सजवू शकता. कृष्ण जन्माष्टमीला मुलांना असे करा तयार धोती आणि कुर्ता कान्हाच्या लूकसाठी लहान मुलांचे धोतर आणि कुर्ता बाजारात सहज उपलब्ध होतात. तुम्ही घरच्या घरी धोती-कुर्ताही बनवू शकता. धोती-कुर्त्याचा रंग पिवळा किंवा केशरी निवडता येईल.
Krishna Janmashtami 2022 : श्रीकृष्ण जन्माष्टमीचा शुभ मुहूर्त कोणता? जन्माष्टमीची पूजा आणि व्रत कसे करावे?मुकुटावर मोरपिस मुलासाठी धोती-कुर्तासोबत जुळणारा रंगीत मुकुट बनवा आणि त्यावर मोरपिसे लावायला विसरू नका. हार आणि बासरी श्रीकृष्णाची ओळख म्हणजे त्यांची मुरली. मुलांचा कृष्णा लूक पूर्ण करण्यासाठी गळ्यात मोत्यांची माळ आणि बासरी आवश्यक आहे. पांढऱ्या मोत्यांच्या माळा पूर्ण आणि सुंदर लूक देतील
Janmashtami 2022: म्हणून पंचामृत सर्व महत्त्वाच्या पूजेमध्ये वापरतात, श्रीकृष्णाशी आहे असा संबंधमेकअप - लहान मुलांची त्वचा संवेदनशील असते, त्यामुळे कोणताही मेकअप करण्यापूर्वी मुलांना मॉइश्चरायझर लावा. - चेहरा चांगला प्रेझेंटेबल करण्यासाठी चेहऱ्यावर फाउंडेशन लावा आणि पिंक ब्लशर गालावर लावा. - डोळ्यांच्या मेकअपसाठी जाड आयलायनर आणि आयशॅडो लावा. - तुम्ही ओठांवर हलकी लाल लिपस्टिकही लावू शकता. - कपाळावर कुंकवाचा टिळा लावून लूक कम्प्लिट करा.