Krishna Janmashtami 2022 : श्रीकृष्ण जन्माष्टमीचा शुभ मुहूर्त कोणता? जन्माष्टमीची पूजा आणि व्रत कसे करावे?

Krishna Janmashtami 2022 : श्रीकृष्ण जन्माष्टमीचा शुभ मुहूर्त कोणता? जन्माष्टमीची पूजा आणि व्रत कसे करावे?

यावर्षी 18 ऑगस्ट 2022 रोजी श्री कृष्ण जन्माष्टमी आहे. कृष्ण जन्माष्टमी सर्वत्र खूप उत्साहात साजरी केली जाते. या दिवशी लोक उपवास करतात आणि श्रीकृष्णाची पूजा करतात.

  • Share this:

मुंबई, 15 ऑगस्ट : श्रीकृष्ण जन्माष्टमी हा मोठा सण आहे. हिंदू कॅलेंडरनुसार, भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला हा उत्सव साजरा केला जातो. कृष्ण जन्माष्टमी सर्वत्र खूप उत्साहात साजरी केली जाते. धार्मिक मान्यतांनुसार, श्रीकृष्णाचा जन्म मथुरेत झाला आणि त्यांचे बालपण मथुरा आणि वृंदावनमध्ये गेले. श्रीकृष्ण जन्माष्टमी संपूर्ण देशात आणि जगभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या दिवशी लोक उपवास करून श्रीकृष्णाची पूजा करतात. पंडित इंद्रमणी शर्मा यांच्याकडून जाणून घेऊया यंदा जन्माष्टमी कधी आहे? आणि जन्माष्टमीची पूजा कशी करावी?

जन्माष्टमीचा शुभ मुहूर्त

यावर्षी 18 ऑगस्ट 2022 रोजी म्हणजेच गुरुवारी कृष्ण जन्माष्टमी साजरी होणार आहे. अष्टमी तिथी 18 ऑगस्ट 2022 रोजी रात्री 09:20 वाजता सुरू होईल आणि 19 ऑगस्ट 2022 रोजी रात्री 10:59 वाजता समाप्त होईल.

Janmashtami 2022: म्हणून पंचामृत सर्व महत्त्वाच्या पूजेमध्ये वापरतात, श्रीकृष्णाशी आहे असा संबंध

श्रीकृष्ण जन्माष्टमीची पूजा पद्धत

कृष्ण जन्माष्टमी 2022 हा अतिशय शुभ सण मानला जातो. या दिवशी लोक एकदिवसीय उपवास करतात. सहसा हा उपवास कृष्णाच्या जन्माच्या दिवशी पाळला जातो आणि लोक त्यांचा जन्म साजरा केल्यानंतर उपवास सोडतात. मध्यरात्रीनंतर कृष्णाच्या मूर्तीला स्नान घालल्यानंतर पूजा सुरू होते.

यानंतर विशेषत: कृष्णाला नवीन वस्त्रे परिधान करून पाळणाघरात बसवले जाते. भक्तिगीते गाऊन त्याची पूजा आणि प्रार्थना केली जाते. श्रीकृष्णाला प्रसाद म्हणून फळे, मिठाई आणि इतर खाद्यपदार्थ अर्पण केले जातात. श्रीकृष्णाला अर्पण केलेला प्रसाद घेऊन लोक उपवास सोडतात.

Gold Shopping : सोनं खरेदी करण्यासाठी शुभ दिवस कोणता? हा दिवस तर टाळाच

श्री कृष्ण जन्माष्टमी व्रत

श्रीकृष्ण जन्माष्टमी व्रताच्या आधी रात्री हलका आहार घ्यावा. विशेषत: जन्माष्टमी व्रताच्या दिवशी सूर्य, सोम, यम, काल, संधि, भूत, पवन, दिक्पति, भूमी, आकाश, खेचर, अमर, ब्रह्मा यांना नमस्कार करून पूर्व किंवा उत्तरेकडे तोंड करून बसावे. यानंतर विधीपूर्वक पूजा करावी.

Published by: Pooja Jagtap
First published: August 15, 2022, 8:00 AM IST

ताज्या बातम्या