JOIN US
मराठी बातम्या / अध्यात्म / श्रीरामाने बांधलेला रामसेतू कसा बुडाला? तरंगणाऱ्या त्या दगडांचे नंतर काय झाले

श्रीरामाने बांधलेला रामसेतू कसा बुडाला? तरंगणाऱ्या त्या दगडांचे नंतर काय झाले

ज्वालामुखीचा ‘प्युमिस स्टोन’ हा बुडत नाही, त्यामुळे हा दगड राम सेतू बांधण्यासाठी वापरण्यात आला होता, असं अनेक तज्ज्ञांचं मत आहे. राम सेतू बांधण्यासाठी वापरण्यात आलेल्या दगडांसारखे दगड देशात काही ठिकाणी संग्रहित करून ठेवण्यात आलेत.

जाहिरात

श्रीरामाने बांधलेला रामसेतू पाण्यात कसा बुडाला

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 25 एप्रिल : प्रभू श्रीरामांनी लंकेतून माता सीतेची सुटका करण्यासाठी रावणाशी युद्ध केलं. या वेळी लंकेवर कूच करण्यासाठी त्यांनी वानरसेनेच्या मदतीनं पूल बांधला. जो ‘रामसेतू’ नावानं ओळखला जातो. पाण्यात तरंगणाऱ्या दगडांचा वापर करून हा पूल बांधण्यात आला होता. पूल बांधण्यासाठी हे दगड दुसऱ्या ठिकाणाहून आणले होते. ज्वालामुखीचा ‘प्युमिस स्टोन’ हा बुडत नाही, त्यामुळे हा दगड राम सेतू बांधण्यासाठी वापरण्यात आला होता, असं अनेक तज्ज्ञांचं मत आहे. राम सेतू बांधण्यासाठी वापरण्यात आलेल्या दगडांसारखे दगड देशात काही ठिकाणी संग्रहित करून ठेवण्यात आलेत. असाच एक दगड उत्तर प्रदेशातील बरेली येथील अलखनाथ मंदिरात पाण्यात तरंगत आहे. पण, त्यानंतर रामसेतू पाण्यात काही फूट का बुडाला, असा प्रश्न अनेकांना पडतो. याबाबत विविध कारणं सांगितली जातात. लंकेवर हल्ला करण्यासाठी श्रीरामांनी धनुष्यकोडी ते श्रीलंकेपर्यंत समुद्रावर त्यांच्या सैन्यासह बांधलेल्या सेतूला ‘नल सेतू’ असं नाव देण्यात आलं होतं. वास्तविक हा पूल वानरांनी नलाच्या देखरेखीखाली 15 दिवसांत बांधला होता. त्याचा उल्लेख ‘वाल्मिकी रामायणामध्ये आहे. गीताप्रेस गोरखपूर येथून प्रसिद्ध झालेल्या श्रीमद वाल्मिकी रामायण-कथा-सुख-सागरमध्ये वर्णन केलं आहे की, श्रीरामांनी या पुलाचे नाव ‘नल सेतू’ ठेवलं होतं. महाभारतातही श्रीरामाच्या नल सेतूचा उल्लेख आहे.

धनुष्यकोडीची केली निवड वाल्मिकी रामायणात असा उल्लेख आहे की, ‘तीन दिवस शोध घेतल्यानंतर श्रीरामांना रामेश्वरममध्ये पूल बांधण्यासाठी समुद्रात एक जागा मिळाली, जिथून श्रीलंकेला सहज जाता येणं शक्य होतं. त्यानंतर नल आणि नील यांच्या मदतीनं त्या ठिकाणाहून लंकेपर्यंत पूल बांधण्यास सुरुवात झाली. वास्तविक, धनुष्यकोडी हे भारत आणि श्रीलंका या दोन देशांमधील एकमेव ठिकाण आहे, जिथे समुद्राची खोली नदीएवढी आहे. धनुष्यकोडी हे भारतातील तमिळनाडूच्या पूर्व किनाऱ्यावरील रामेश्वर बेटाच्या दक्षिणेकडील किनाऱ्यावरील एक गाव आहे. ते पंबनच्या आग्नेयेला आहे. धनुष्यकोडी हे श्रीलंकेतील तलाईमन्नारच्या पश्चिमेला सुमारे 18 मैलांवर आहे. येथून श्रीलंकेपर्यंत वानरसैन्यानं बांधलेल्या पुलाचा आकार धनुष्यासारखा आहे, म्हणून आता या गावाला धनुष्यकोडी म्हणून ओळखलं जातं. हे सर्व क्षेत्र मन्नार सागरी क्षेत्रांतर्गत मानलं जातं.

राम सेतूचा उल्लेख कुठे आहे? पूल बनवताना उच्च तंत्रज्ञानाचा वापर केल्याचे अनेक पुरावे वाल्मिकी रामायणात आहेत. काही वानरांनी मोठमोठे दगड समुद्रकिनाऱ्यावर आणले होते. काही वानरांनी पूल बांधण्यासाठी लांब सूत धरलं होतं. पुलाच्या बांधकामात या धाग्याचा अनेक प्रकारे वापर होत होता. कालिदासांनी ‘रघुवंश’च्या 13 व्या वाक्यात रामाच्या आकाशमार्गातून परत येण्याचं वर्णन केलं आहे. यामध्ये श्रीरामांनी माता सीतेला राम सेतूबद्दल सांगितल्याचं वर्णन आहे. स्कंद पुराणातील तिसरं, विष्णू पुराणातील चौथं प्रकरण तसंच अग्नि पुराणातील पाचवे ते अकरावं प्रकरण आणि ब्रह्म पुराणातही श्रीरामाच्या सेतूचा उल्लेख आहे. 

रामसेतूबाबत विज्ञान काय सांगतं? 1993 मध्ये, यूएस स्पेस एजन्सी नासाने श्रीलंकेच्या वायव्येकडील धनुष्यकोडी आणि पंबन दरम्यानच्या समुद्रात 48 किमी रुंद पट्टी असलेल्या भूभागाची जागतिक उपग्रह प्रतिमा प्रसिद्ध केली होती. यानंतर भारतात यावरून राजकीय वाद सुरू झाला. या पुलासारखा भूभाग रामसेतू म्हणून ओळखला जाऊ लागला. नासानं 14 डिसेंबर 1966 रोजी मिथुन-11 मधून रामसेतूचे फोटो काढले होते. 22 वर्षांनंतर, आयएएस-1ए ला तामिळनाडूच्या किनाऱ्याजवळील रामेश्वरम आणि जाफना बेटांमध्ये समुद्राखाली एक भूभाग सापडला. मग त्याचे फोटो काढले. या फोटोंमुळे अमेरिकन उपग्रहाच्या फोटोंना पुष्टी मिळाली.

अमेरिकी पुरातत्त्वशास्त्रज्ञांनीही तपास केला डिसेंबर 1917 मध्ये सायन्स चॅनलवरील अमेरिकन टीव्ही शो ‘ओल्ड लँड ब्रिज’ मध्ये, अमेरिकन पुरातत्त्वशास्त्रज्ञांनी वैज्ञानिक तपासणीच्या आधारे सांगितलं होतं की, प्रभू श्रीराम यांच्याविषयी सांगितली जाणारी पूल बांधण्याची हिंदू पौराणिक कथा सत्य असू शकते. भारत आणि श्रीलंकेदरम्यानची 50 किलोमीटर लांबीची रेषा खडकांपासून बनलेली आहे. हे खडक 7000 वर्षे जुने आहेत. त्याच वेळी, ज्या वाळूवर हे खडक आहेत, ती वाळू 4000 वर्षे जुनी आहे. नासाच्या उपग्रहाने घेतलेले फोटो आणि इतर पुराव्यांवरून तज्ज्ञ म्हणतात की, ‘खडक आणि वाळूच्या युगातील या विसंगतीवरून हे स्पष्ट होते की, हा पूल मानवांनी बांधला असावा. दरम्यान, सर्वप्रथम श्रीलंकेतील मुस्लिमांनी या पुलाला ‘आदम पूल’ म्हणायला सुरुवात केली. तर, ख्रिश्चनांनी त्याला ‘अॅडम्स ब्रिज’ म्हणायला सुरुवात केली. हे वाचा -  उंबरठ्यावर हळदीचं पाणी शिंपडण्याचे हे चमत्कारिक फायदे; हसतं-खेळतं राहतं कुटुंब रामसेतू समुद्रात कसा बुडाला? रामसेतू समुद्राच्या पाण्यात काही फूट खाली बुडाल्याचे दोन पैलू आहेत. यातील एक धार्मिक आणि दुसरा नैसर्गिक आहे. आतापर्यंत जगभरातील संशोधकांनी रामसेतूवर अनेक अभ्यास केले आहेत. 15 व्या शतकापर्यंत या पुलावरून चालत रामेश्वरम येथून मन्नार बेटावर पोहोचता येत होते, असं अनेक संशोधनांमध्ये म्हटलं आहे. नंतर हा पूल पाण्याखाली गेल्याचं शास्त्रीय कारण सांगितलं जातं की, वादळामुळे रामसेतूच्या ठिकाणी समुद्र खोल गेला. त्याच वेळी, 1480 मध्ये चक्रीवादळामुळे हा पूल तुटला. त्यानंतर समुद्राची पातळी वाढल्यानं रामसेतू काही फूट पाण्यात बुडाला. तर, विभीषणानं स्वतः प्रभू श्रीरामांना हा पूल तोडण्याची विनंती केली होती, असं धार्मिक कारणही सांगितलं जातं. हे वाचा -  शनी मागे लागलाच म्हणून समजा; जीवनात अशी कामं करणाऱ्यांना शनी सोडत नाही कधी म्हणून विभीषणानं तोडला रामसेतू! पद्मपुराणानुसार, युद्धापूर्वी रावणाचा भाऊ विभीषण याने धनुष्यकोडी नगरात श्रीरामाचा आश्रय घेतला होता. रावणाशी युद्ध संपल्यानंतर श्रीरामांनी विभीषणला लंकेचा राजा बनवले. यानंतर लंकेचा राजा विभीषण यांनी श्रीरामांना सांगितलं की, भारतातील एखादा राजा श्रीलंकेवर हल्ला करण्यासाठी राम सेतूचा वापर करेल. यामुळे श्रीलंका स्वातंत्र्य गमावू शकते. त्यामुळे विभीषणानं प्रभू श्रीरामांना पूल तोडण्याची विनंती केली. यावर श्रीरामांनी पुलाला बाण मारला, आणि हा पूल पाण्याच्या पातळीपासून 2-3 फूट खाली बुडाला. आजही या पुलावर कोणी उभे राहिल्यास त्याच्या कंबरेपर्यंत पाणी येते. वाल्मिकी रामायणात मात्र याचा कुठेही उल्लेख नाही. कंबन रामायणात श्रीरामांनी हा पूल तोडल्याचा उल्लेख आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या