शास्त्रानुसार, जे लोक मोकाट प्राण्यांना विशेषतः कुत्र्यांचा छळ करतात, त्यांना विनाकारण मारतात, अशा लोकांना शनिदेवाच्या प्रकोपाचा सामना करावा लागतो.
जे लोक अस्वच्छता पसरवतात आणि अस्वच्छतेत राहतात त्यांना शनीची कृपा कधीच मिळत नाही. शनिदेवाच्या अशुभ छायेमुळे अशा लोकांना आजार, अडचणी, आर्थिक तंगी, अपयशाचा सामना करावा लागतो.
शनीला कर्माचा दाता म्हटले जाते. त्यामुळे जे स्वतःच्या फायद्यासाठी गरीब, लाचारांचे नुकसान करतात, वाईट कृत्ये, चोरी आणि फसवणूक करणाऱ्यांना शनि आयुष्यभर शिक्षा देतो. शनिकोपामुळे अशा लोकांचा वाईट काळ सुरू होतो.
ज्या ठिकाणी ज्येष्ठांचा अपमान होतो, आईशी अपशब्द वापरणार्याला शनीच्या कोपाचे धनी बनावे लागते. असे केल्याने शनी श्रीमंतांनाही गरीब बनवतात.
अमावस्या किंवा शनिवारी मद्यपान करणाऱ्यांना शनि क्षमा करत नाही. अशा लोकांवर जेव्हा शनि महादशा येते, तेव्हा त्यांना प्रत्येक टप्प्यावर त्रास सहन करावा लागतो.
पिंपळाचे झाड पूजनीय मानले गेले आहे. असे मानले जाते की, जे लोक पिंपळाच्या झाडाचे कोणत्याही प्रकारे नुकसान करतात, ते तोडतात किंवा कापताना पाहतात त्यांच्यावर शनिचा कोप होतो.
शनिदोषापासून मुक्ती मिळवायची असेल तर शनिवारी शनिमूर्तीला तेल अर्पण करा आणि गरीब, गरजूंना मदत करा, शनी चालीसा नित्य पाठ करा. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)