1. हळद अतिशय पवित्र मानली जाते. म्हणूनच घराच्या उंबरठ्यावर हळदीचं पाणी शिंपडल्यानं सकारात्मक ऊर्जा येते आणि घरात सुख-शांती नांदते.
2. पूजेतही हळदीचा वापर होतो. असे म्हणतात की, घराच्या उंबरठ्यावर हळदीचं पाणी शिंपडल्यानं घरातील नकारात्मक शक्ती निघून जातात आणि संकटेही टळतात.
3. ज्योतिष शास्त्रानुसार, घराचा उंबरठा हा ग्रहांचा केंद्रबिंदू मानला जातो. म्हणूनच असे मानले जाते की, उंबरठ्यावर हळदीचं पाणी शिंपडल्यानं घरातील वास्तु आणि ग्रह दोष दूर होतात.
4. ज्योतिष शास्त्रानुसार घराचा उंबरठा राहूशी संबंधित मानला जातो. म्हणूनच उंबरठ्यावर हळदीचं पाणी शिंपडल्यानं राहुचे दुष्परिणाम घरावर होत नाहीत आणि घरात सुख-समृद्धी आणि वृद्धी होते.
5. घराच्या मुख्य दरवाजावर श्रीगणेशाचे पुत्र शुभ-लाभ स्थापित केले जातात. त्यामुळे उंबरठ्यावर हळदीचं पाणी शिंपडल्यानं घरात सर्व शुभकार्य होतात.
6. असे मानले जाते की, दररोज उंबरठ्याशी स्वस्तिक काढून नंतर त्यावर हळदीचं पाणी शिंपडल्यास माता लक्ष्मी आणि माता अन्नपूर्णा प्रसन्न होतात आणि घरात लक्ष्मीचा वास कायम राहतो.
7. ज्योतिष शास्त्रानुसार, हळदीच्या पाण्यात एक रुपयाचे नाणे बुडवून त्याने उंबरठ्यावर पाणी शिंपडून रुपया देव्हाऱ्यात ठेवल्यास जीवनात पैशाची कमतरता कधीच भासत नाही. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)