JOIN US
मराठी बातम्या / अध्यात्म / Gurupurnima : गुरुपौर्णिमेच्या दिवशी 'या' राशींच्या व्यक्तींनी करा दान, होईल भरभराट

Gurupurnima : गुरुपौर्णिमेच्या दिवशी 'या' राशींच्या व्यक्तींनी करा दान, होईल भरभराट

गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने कोणत्या राशीच्या व्यक्तींना दानधर्माचा सर्वाधिक फायदा आहे?

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कोल्हापूर, 29 जून : सण आणि उत्सवाच्या काळात दानधर्म करण्याची प्रथा सर्व धर्मात आढळते. पवित्र कालखंडात केलेल्या दान-धर्माचा काही तरी लाभ आपल्याला व्हावा अशी सुप्त इच्छा प्रत्येकाच्या मनात असते. गुरूपौर्णिमा हा देखील असाच एक पवित्र दिवस आहे. या दिवशी कोणत्या राशीच्या व्यक्तींना दानधर्माचा सर्वाधिक फायदा आहे ते पाहूया… ‘या’ राशींना फायदा गुरुपौर्णिमेच्या दिवशी दानधर्म आणि इतर गोष्टींचा सर्वात जास्त लाभ फक्त काही राशींनाच होणार आहे. ही फलप्राप्ती कोणत्याही प्रकारच्या असू शकते. ती व्यक्ती विद्यार्थी असेल तर शैक्षणिक प्रगती होते. अन्य व्यक्तींना कामातील बढती/ व्यवसायात फायदा मिळतो. काहींना धनप्राप्ती देखील होते, असं कोल्हापूरमधील पुजारी अरविंद वेदांते यांनी स्पष्ट केले आहे.

वेदांते गुरुजी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘गुरुपौर्णिमा म्हणजेच व्यास पौर्णिमा हा गुरुं प्रती आदर भावना व्यक्त करण्याचा दिवस आहे. आपल्या जीवनात असणाऱ्या प्रत्येक गुरूला या दिवशी मनोभावे प्रणाम करून त्यांनी आपल्याला दिलेल्या ज्ञाना बद्दल कृतज्ञता व्यक्त करावी. यावेळी मिळालेले गुरूंचे आशीर्वाद नक्कीच मनुष्याला लाभदायक असतात. बारा राशींपैकी मेष, कर्क आणि सिंह या तीन राशीच्या व्यक्तींना गुरुपौर्णिमेच्या दिवशी फलप्राप्ती होऊ शकते. ही फलप्राप्ती वेगवेगळ्या स्वरूपाची असू शकते. त्यासाठी या व्यक्तींनी गुरु पौर्णिमेच्या निमित्त गुरुचरित्राचे अध्ययन करावे. शक्य तितके दानधर्म करावे. आपल्या गुरूंचे आशीर्वाद घेऊन त्यांना गुरुदक्षिणा अर्पण करावी, असेही वेदांते गुरुजी यांनी सांगितले आहे. गुरुपौर्णिमेला फिरेल या 3 राशींच्या भाग्याचे चक्र! वैवाहिक जीवन होईल सुखी काय आहेत फायदे? मेष :  या राशीच्या व्यक्तींनी गुरूपौर्णिमेच्या दिवशी दान धर्म केले, आपल्या गुरुंना गुरुदक्षिणा अर्पण केली, तर या राशीतील लोकांना नोकरीमध्ये बढती मिळण्याची शक्यता आहे. याबरोबरच कामात प्रामाणिक असणारी व्यक्ती नक्कीच उच्च पदावर जाऊ शकते. कर्क : या राशीच्या व्यक्तींना उद्योगधंदे किंवा व्यापारात फलप्राप्ती मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे कर्क राशीची व्यक्ती गुरु पौर्णिमेच्या दिवशी दानधर्म करुन व्यापारातील वृद्धी प्राप्त करू शकते. सिंह : या राशीच्या व्यक्ती गुरुपौर्णिमेच्या दिवशी आयुष्यातील अनेक अडचणी दूर करू शकतात. या राशींच्या व्यक्तींची या दिवशीच्या दान धर्मातून मनस्ताप, विवाहातील किंवा वैवाहिक जीवनातील अडचणींतून मुक्तता मिळू शकते. दरम्यान, इतर राशीच्या लोकांनी देखील गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुचरित्राचे वाचन करत दानधर्म केले तर प्रत्येकाला येणारा दिवस शुभ जाऊ शकतो, असेही वेदांते गुरुजींनी सांगितले आहे. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या