मुंबई, 15 सप्टेंबर : शारदीय नवरात्रीमध्ये दुर्गा मातेच्या विविध रूपांची पूजा केली जाते. घरात कलशाची स्थापना केली जाते. काही लोक पूजेच्या नियमांचा आधार घेऊन मातेचे व्रत ठेवून उद्यानपणही करतात. 9 दिवसांच्या नवरात्रीमध्ये आपण मातेच्या व्रतातील प्रत्येक लहान-मोठ्या गोष्टींकडे विशेष लक्ष देतो. कोणत्याही विशेष व्रत-उत्सवात मूर्तीची प्रतिष्ठापना करताना दिशा योग्य ठेवणे महत्त्वाचे मानले जाते. योग्य दिशा निवडणे फार गरजेचे आहे कारण पुराणात देवी-देवतांना प्रसन्न करण्यासाठी दिशा सांगितली आहे. शिवराजपूरचे पंडित राज नारायण यांच्या मते, देवी दुर्गेच्या मूर्तीची स्थापना नेहमी पूर्व दिशेला करावी, कारण पूर्व दिशा ही सकारात्मक उर्जेचा स्रोत मानली जाते. यासोबतच अलौकिक शक्तीचा प्रवाह देखील पूर्व दिशेकडून येतो, त्यामुळे प्रतिष्ठापनेसाठी पूर्व दिशा ही दिशांमध्ये अधिक योग्य आहे. यासोबतच उपवास करताना आपल्याकडून कोणतीही चूक होणार नाही याची काळजी घ्यावी. आज आपण या नवरात्री पूजेच्या मुख्य मुद्द्यांबद्दल बोलू. नवरात्रीमध्ये उपवास करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, जेणेकरून तुमचा उपवास यशस्वी होईल. नवरात्रीत लसूण आणि कांदा टाळा - याकाळात जे लोक उपवास करतात त्यांनी धान्य आणि मीठाचे सेवन करू नये. ज्यांना मीठाशिवाय उपवास ठेवता येत नाही, ते सैंधव मीठ वापरू शकतात. उपवास करणाऱ्या व्यक्तीने कोणाची निंदा करू नये किंवा वाईट विचार करू नये. उपवासाच्या काळात सकारात्मक विचार असावा. नऊ दिवस दुर्गा सप्तशती पाठ करा आणि दुर्गा मातेला गोड-धोड पदार्थांचा नैवेद्य अर्पण करा. हे वाचा - नवरात्रीसाठी खास शुभेच्छा आणि संदेश आजच करा शेअर उपवास करणाऱ्याने जमिनीवर झोपावे. उपवास करणाऱ्यांनी उपवास काळात नखे किंवा केस कापू नयेत. दाढीही करणे टाळावे. नवरात्रात ब्रह्मचर्य पाळले पाहिजे. हे वाचा - कोणतंही रत्न धारण करण्यापूर्वी जाणून घ्या या गोष्टी, फायद्याऐवजी नुकसान होऊ शकतं (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)