मुंबई, 26 ऑगस्ट : जीवनात येणाऱ्या अडथळ्यांमुळे अनेकदा लोक घाबरतात. जीवनात चढ-उतार येणे सर्वसामान्य बाब आहे. परंतु, जर तुम्हाला तुमच्या कामात सतत समस्या येत असतील. त्यामुळे अशा स्थितीत आपण विद्वान ज्योतिषाच्या सल्ल्याने रत्नही धारण करू शकता. रत्नशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार, रत्नांमध्ये इतकी शक्ती असते की ते कोणत्याही व्यक्तीचे आयुष्य उलथापालथ करू शकतात. रत्न धारण करण्यापूर्वी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, याविषयी भोपाळचे ज्योतिषी आणि पंडित हितेंद्र कुमार शर्मा सांगत (Rules of Wearing Gemstones) आहेत. कोणतेही रत्न धारण करण्यापूर्वी, एखाद्या विद्वान ज्योतिषाला तुमची कुंडली दाखवणे फार महत्त्वाचे आहे. ज्योतिष शास्त्राचा सल्ला घेतल्यानंतर रत्न खरेदी करतानाही काळजी घेणे आवश्यक आहे. रत्नाचा रंग, आकार, वजन आणि शुद्धता जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. कोणतेही रत्न खरेदी करताना एका गोष्टीची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे की, रत्न कोठूनही तुटलेले असू नये. याशिवाय रत्न खरेदीसाठीही शुभ मुहूर्त आहेत. त्यामुळे रत्न खरेदी करताना त्याचा शुभ मुहूर्त जाणून घेणे आवश्यक आहे. जर आपल्याला रत्न अंगठीत किंवा लॉकेटमध्ये घालायचे असेल तर हे रत्न तुमच्या त्वचेला स्पर्श करणारे असणे आवश्यक आहे. हे रत्न संबंधित ग्रहाच्या दिवशी शुभ मुहूर्तावर, शुभ नक्षत्रात आणि शुभ मुहूर्तावर पूर्ण विधी केल्यानंतरच धारण करावे. हे वाचा - Ganesh Chaturthi 2022: गणपतीची प्रतिष्ठापना करताना या गोष्टी चुकवू नका, दिशा आहे महत्त्वाची एखाद्या ग्रह विषयाशी संबंधित रत्न त्याच्या संबंधित शुभ धातूमध्ये घालणे चांगले. कोणतेही रत्न त्याच्या नेमलेल्या बोटात धारण केले पाहिजे. याशिवाय रत्न धारण केल्यानंतर ते पुन्हा पुन्हा बोटातून काढू नये. कोणतेही रत्न धारण करण्यापूर्वी त्याची शुद्धता तपासणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणून, रत्न घालण्यापूर्वी, ते 3 दिवस उशीखाली ठेवा. असे केल्याने, जर तुम्हाला वाईट स्वप्न पडले नाहीत किंवा तुमच्या आयुष्यात काहीही वाईट घडले नाही, तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही हे रत्न धारण करू शकता. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.