JOIN US
मराठी बातम्या / अध्यात्म / 41 दिवस आगीत केली तपस्या...कारण ऐकाल तर म्हणाल अरे देवा!

41 दिवस आगीत केली तपस्या...कारण ऐकाल तर म्हणाल अरे देवा!

मला विधात्यावर पूर्ण विश्वास आहे. माझा एकही तप व्यर्थ जाणार नाही. उलट…

जाहिरात

भीषण उकाड्यापासून वाचण्यासाठी ते शरीराला भस्म लावतात.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

संजय राघव, प्रतिनिधी सोहना, 10 जून : हरियाणाच्या गुडगाव जिल्ह्यातील सोहना भागात सध्या एक साधू मोठ्या चर्चेचा विषय ठरले आहेत. विश्वशांतीसाठी 40 डिग्रीहून अधिक तापमानात चारही बाजूंनी अग्नी लावून एकाच जागी केवळ 11-12 नाही, तर तब्बल 41 दिवस त्यांनी तप केला. स्वामी ओमनाथ असं त्यांचं नाव आहे. आज आपण जराही उकाडा सहन करू शकत नाही, थोडं उकडलं तरी आपण पावसाची वाट पाहू लागतो. अशा परिस्थितीत हे साधू एवढी भीषण गरमी कशी सहन करत असतील, याबाबत सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे. मिळलेल्या माहितीनुसार, स्वामी ओमनाथ सकाळी 11 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत तप करतात. चहूबाजूंनी आगीत बसल्यावर भीषण उकाड्यापासून वाचण्यासाठी ते शरीराला भस्म लावतात.

विशेष म्हणजे हे साधू दरवर्षी विश्व कल्याणासाठी महादेवाची आराधना करतात. जगात शांती निर्माण व्हावी अशी त्यांची इच्छा आहे. परंतु नेमकं यासाठी तेच का प्रयत्न करतात, असा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. परंतु साधूंना विश्वास आहे की, त्यांची तपश्चर्या कधीच व्यर्थ नाही जाणार. Smallest country of the World : जगातील सर्वात लहान देश, जिथे राहतात फक्त 27 लोक स्वामी ओमनाथ म्हणतात की, ‘मला विधात्यावर पूर्ण विश्वास आहे. माझा एकही तप व्यर्थ जाणार नाही. उलट जगात शांतता निर्माण होईल आणि ती टिकून राहील. प्रत्येकाचं कल्याण होईल.’

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या