मुंबई, 10 जून : जगातील सर्वात जास्त लोकसंख्या आणि क्षेत्रफळ असलेल्या देशांची नेहमीच चर्चा होत असते. पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या देशमध्ये नेहमीच चढाओढ होत असते. पण तुम्हाला माहित आहे का असा एक देश आहे जिथे फक्त 27 लोक राहतात. हा देश जगातील सर्वात लहान देश आहे. हे जगातील सर्वात लहान देशाचं नाव सीलँड आहे. जे इंग्लंडजवळ आहे. हा देश इंग्लंडच्या सफोक बीचपासून 10 किमी अंतरावर आहे. हा देश तेथील एका किल्ल्यावर वसलेला आहे. Viral News : तुम्हाला माहितीय का जगातील सर्वात गरीब देश? दारिद्र्य काय असतं यांना विचारा दुसऱ्या महायुद्धात हा किल्ला ब्रिटिशांनी बांधला होता. नंतर त्यांनी हा किल्ला रिकामा केला. तेव्हापासून सीलँडवर वेगवेगळ्या लोकांनी कब्जा केला आहे. या देशाला माइक्रो नेशन म्हणतात. सुमारे 13 वर्षांपूर्वी, 9 ऑक्टोबर 2012 रोजी, रॉय बेट्स नावाच्या व्यक्तीने स्वत: ला सीलँडचा राजकुमार घोषित केले. बेट्सच्या मृत्यूनंतर, त्याचा मुलगा मायकेल याने राज्य केले. या लहान देशाला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळालेली नाही. तो कोणत्याही देशाचा भाग नाही. अनेक वर्षापासून बंद होती खोली, जेव्हा उघडलं तेव्हा समोर आली रहस्यमय गोष्ट सीलँडचे एकूण क्षेत्रफळ 250 मीटर (0.25 किमी) आहे. पण जीर्ण अवस्थेत पोहोचलेल्या या किल्ल्याला सीलँड व्यतिरिक्त रफ फोर्ट असेही म्हणतात. आंतरराष्ट्रीय मान्यता मिळालं नसतानाही, सीलँडचे स्वतःचे चलन आणि मुद्रांक आहे. सीलँडचे क्षेत्रफळ फारच कमी असल्याने तेथे उपजीविकेचे कोणतेही साधन नाही.
सोशल मीडियाच्या माध्यमातून जेव्हा लोकांना या देशाची माहिती झाली तेव्हा इथल्या लोकांच्या मदतीसाठी लोक पुढे आले. त्यांनी भरपूर दान दिले. त्यामुळे येथील जनतेला आर्थिक मदत मिळाली. यानंतर येथील लोकांचा उदरनिर्वाह सुरू झाला. आता लोक इथे फिरायला जातात, त्यामुळे इथे लोक कमाई करू लागले आहेत. या माइक्रो नेशनचे स्वतःचे हेलिपॅड देखील आहे. सीलँड हा अनोळखी देशांपैकी सर्वात लहान देश मानला जाऊ शकतो, परंतु व्हॅटिकन सिटी हा जगातील सर्वात लहान देश आहे. युरोपियन कंट्री वर्टिकल सिटी हे इटलीची राजधानी रोमच्या मध्यभागी स्थित आहे, ज्याचे क्षेत्रफळ 0.44 चौरस किमी म्हणजेच अर्ध्या किलोमीटरपेक्षा कमी आहे.