JOIN US
मराठी बातम्या / पुणे / VIDEO: पुण्यातील कंटेन्मेंट झोनमध्ये चक्क सायकलवर गस्त घालतोय हा पोलीस अधिकारी

VIDEO: पुण्यातील कंटेन्मेंट झोनमध्ये चक्क सायकलवर गस्त घालतोय हा पोलीस अधिकारी

देशात कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव महाराष्ट्रात आहे. त्यात मुंबईनंतर राज्यातील कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण पुण्यात आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 22 जुलै: देशात कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव महाराष्ट्रात आहे. त्यात मुंबईनंतर राज्यातील कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण पुण्यात आहेत. पुण्याचा अनेक भाग कंटेनमेंट भाग म्हणून घोषित करण्यात आला आहे. पुण्यात दत्तवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे हे लॉकडाऊनमध्ये चक्क सायकलवरून पेट्रोलिंग करत आहेत. हेही वाचा… प्रकल्प अधिकाऱ्यानं अंगणवाडी महिलांच्या ग्रुपवर पोस्ट केला स्वतःचा न्यूड फोटो पोलीस निरीक्षक देविदास घेवारे यांच्या अंतर्गत तब्बल 14 कंटेंटमेंट झोन असल्याने बहुतांश गल्ली बोळा या त्यांच्याच कर्मचाऱ्यांनी पत्रे आणि बांबू लावून सील करून टाकल्या आहेत. म्हणून देविदास घेवारे यांनी स्वत:च सायकलवर पेट्रोलिंग सुरू केलं आहे. स्वत: पोलीस इंचार्जच सायकल फिरून रहिवाशांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन करत असल्याचं म्हटल्यावर नागरिकही या अनोख्या पोलिसिंगला उत्तम प्रतिसाद देत असल्याचं देविदास घेवारे यांनी सांगितलं आहे.

संबंधित बातम्या

देविदास घेवारे यांनी यापूर्वी कोरोना व्हायरसची 3 D प्रतिकृती नाकांबदी पॉंईट्सवर लावून लोकांचं लक्ष वेधून घेतलं होतं. दत्तवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत पर्वतीदर्शन, पाणमळा, जनता वसाहत अशा सर्वाधिक कोरोनाबाधित झोपडट्ट्या समाविष्ट आहेत. दरम्यान, दत्तवाडी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत सहा लाख इतकी लोकसंख्या आहे. सध्या यातील अडीच हजाराच्या वर रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आहेत. यात ॲक्टिव रुग्ण संख्या सातशेच्या घरात आहे. या भागातील 50 हून अधिक रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. ही संख्या दररोज वाढताना दिसत आहे. हेही वाचा… मुंबई-नाशिक महामार्गावरील भीषण अपघात, दोन कंत्राटी कामगार जागीच ठार आता या परिसरात 14 कंटेनमेंट झोन तयार करण्यात आले आहेत. या दत्तवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत चार पोलिस चौक्या आहेत या पोलिस स्टेशनचा संपूर्ण स्टाफ 84 इतका आहे. परंतु 14 कंटेनमेंट झोन असल्यामुळे जास्तीत जास्त वेळ ड्युटी करावी लागत असल्याची देविदास घेवारे यांनी सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या