मुंबई-नाशिक महामार्गावरील भीषण अपघात, दोन कंत्राटी कामगार जागीच ठार

मुंबई-नाशिक महामार्गावरील भीषण अपघात, दोन कंत्राटी कामगार जागीच ठार

मुंबई-नाशिक महामार्गावरील अंजूर पेट्रोल पंपासमोर दुचाकी-कारचा भीषण अपघात झाला आहे.

  • Share this:

भिवंडी, 22 जुलै: मुंबई-नाशिक महामार्गावरील अंजूर पेट्रोल पंपासमोर दुचाकी-कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दुचाकीवरील दोघांचा जागेवरच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. मृत दोघे कंत्राटी कामगार होते, अशी माहिती समोर आली आहे.

हेही वाचा... प्रकल्प अधिकाऱ्यानं अंगणवाडी महिलांच्या ग्रुपवर पोस्ट केला स्वतःचा न्यूड फोटो

मिळालेली माहिती अशी की, ठाणे महानगर पालिकेच्या मुंब्रा विभागात स्वच्छता विभागात कंत्राटी काम करणारे तिघे कर्मचारी दुचाकीवरून कर्तव्यावर जात होते. मुंबईकडून येणाऱ्या आर्टिका कार चालकाने माणकोली ब्रिजलगतच्या अंजूर पेट्रोल पंपावर डिझेल भरण्यासाठी अचानक वळण घेतल्याने भरधाव दुचाकी कारवर आदळून भीषण अपघात झाल्याची घटना सकाळी घडली आहे. या अपघातात दुचाकीवरील दोघे कंत्राटी कामगार जागीच ठार तर एक सहकारी कामगार गंभीर जखमी झाला आहे.

पंढरीनाथ वामन चौधरी (36 रा.आंबेटेंभे, मुरबाड), मिलिंद बाबू खंदारे (24, रा. मोहने) अशी अपघातातील मृतांची नाव आहे. तर संदीप दशरथ धोत्रे  (29, रा.आंबिवली ) हा गंभीर जखमी झाला असून त्याला बेशुद्ध अवस्थेत उपचारासाठी कल्याणच्या रुक्मिणी हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले आहे.

तिघे कंत्राटी कामगार ठाणे महापालिकेत स्वच्छता विभागात कंत्राटी कामगार असल्याने ते रोजच्या प्रमाणे मुंब्रा येथे आपल्या कर्तव्यावर जात होते. मुंबईहून औरंगाबादकडे आई व बहीण या दोघींना घेऊन जाण्यासाठी निघालेला कार चालक प्रशांत सूर्यकांत इंगळे (30, रा.कुर्ला, मुंबई) याने त्याची कार डिझेल भरण्यासाठी उजव्या बाजुकडील अंजूर पेट्रोल पंपावर अचानकपणे वळण घेतलं. यावेळी भरधाव बजाज एव्हेंजर दुचाकी कारवर जाऊन आदळल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील तिघांच्याही  डोक्याला, छातीला, हात व पायाला गंभीर मार लागून दुखापत झाल्याने अतिरक्तस्रावाने पंढरीनाथ व मिलिंद या दोघांचा रोडवर तडफडून जागीच मृत्यू झाला. तर सहकारी संदीप हा गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी कल्याणच्या रुक्मिणी हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.

या अपघाताचा नारपोली पोलिस ठाण्यात कार चालक प्रशांत इंगळे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यास पोलिस उपनिरीक्षक जी. बी. गणेशकर यांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे.

हेही वाचा...'आम्ही कायबी करीन, आमचं दूध हाय' शेतकऱ्याच्या लेकाने केली दुधाने अंघोळ, VIDEO

दरम्यान, मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगांव टोल नाका ते वडपे बायपास नाका या दरम्यानच्या रोडवर सद्या रोजच्या रोज वाहनांचे भीषण अपघात होत आहेत. या अपघातांमध्ये प्रवाशी नागरिकांना हकनाक प्राण गमवावे लागत आहेत. त्यामुळे वाढते अपघात टाळण्यासाठी राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तातडीने या रोडवर उपाय योजना करून अपघात मुक्त महामार्ग निर्माण करावा, अन्यथा भाजप रास्ता रोको आंदोलन छेडून सरकारचे लक्ष वेधेल, असा इशारा भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव दयानंद चोरघे यांनी दिला आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: July 22, 2020, 5:01 PM IST

ताज्या बातम्या