जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / बेशरमीचा कळस! प्रकल्प अधिकाऱ्यानं अंगणवाडी महिलांच्या ग्रुपवर पोस्ट केला स्वतःचा न्यूड फोटो

बेशरमीचा कळस! प्रकल्प अधिकाऱ्यानं अंगणवाडी महिलांच्या ग्रुपवर पोस्ट केला स्वतःचा न्यूड फोटो

बेशरमीचा कळस! प्रकल्प अधिकाऱ्यानं अंगणवाडी महिलांच्या ग्रुपवर पोस्ट केला स्वतःचा न्यूड फोटो

महिला बालविकास प्रकल्प अधिकाऱ्याचा गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. आता तर प्रकल्प अधिकाऱ्यानं बेशरम पणाचा कळसच केला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

बीड, 22 जुलै: महिला बालविकास प्रकल्प अधिकाऱ्याचा गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. आता तर प्रकल्प अधिकाऱ्यानं बेशरम पणाचा कळसच केला आहे. अधिकाऱ्यानं चक्क महिला अंगणवाडी कार्यकर्त्यांच्या शासकीय कामकाजाच्या ग्रुपवर स्वतःचा न्यूड फोटो पोस्ट केला. या प्रकारामुळे चांगलाच गोंधळ उडाला आहे. हेही वाचा.. शरद पवारांनी तेढ निर्माण करू नये, ‘सिल्व्हर ओक’वर 50000 पोस्टकार्ड पाठवणार बीड शहरातील ही घटना असून बुधवारी हा धक्कादायक प्रकार समोर आला. या प्रकारामुळे महिला अंगणवाडी कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. या पूर्वीही या अधिकाऱ्यानं त्याचे प्रायव्हेट फोटो ग्रुपवर शेअर केल्याची तक्रार महिलांनी केली होती. Beed Icds urban नावाच्या फक्त महिलांच्या ग्रुपवर अधिकाऱ्यांचा स्वत:चा न्यूड फोटो पोस्ट करून चावटपणा केला आहे. या प्रकारामुळे अनेक महिला ग्रुपमधून बाहेर पडल्या. तर या प्रकारामुळे काही महिलांच्या घरी भांडणही झाली. अंगणवाडी महिलाच्या ग्रुपवर असेही प्रकार चालतात काय, असं काही महिलांना त्यांच्या पतीनं सुनावल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या प्रकारामुळे महिला प्रचंड चिडल्या आहेत. बेशरम अधिकाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी महिलांनी केली आहे. काम करताना सतत त्रास देत असल्याचा महिलांनी आरोप केला आहे. अशा भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याच्यावर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे. या अगोदर महिलां कर्मचाऱ्यांसोबत असभ्य वर्तवणूक केल्यामुळे या बेशरम अधिकाऱ्यांच्याविरुद्ध भादंवि कलम 353 चा गुन्हा दाखल करण्यात आला होता. हेही वाचा…. शरद पवार खासदारकीची शपथ घेत असताना त्यांच्याविरोधात नाशिकमध्ये घोषणाबाजी दुसरीकडे, अंघोळ करतानाचा न्यूड फोटो मोबाइल हॅक करून बदनामी केल्याच्या अधिकाऱ्यांनं बनाव केला आहे. मात्र, या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते आणि महिला आक्रमक गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.  संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात