JOIN US
मराठी बातम्या / पुणे / आणखी एका आत्महत्येनं पुणे हादरलं, पगार न दिल्याने सुपरवायझरची आत्महत्या

आणखी एका आत्महत्येनं पुणे हादरलं, पगार न दिल्याने सुपरवायझरची आत्महत्या

मयत रवींद्र सिंग हे सीएमई येथे सुरू असलेल्या बांधकाम साईटवर सुपरवायझर म्हणून काम करीत होते.

जाहिरात

रविवारी सकाळी त्यांच्या कुटुंबीयांनी दरवाजा वाजवला तेव्हा आतून उत्तर आलं नाही. त्यानंतर खिडकीतून पाहिलं तर दोघे पती-पत्नी गळफास लावलेल्या अवस्थेत दिसत होते.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

भोसरी, 10 जुलै : ठेकेदाराने पगार न दिल्याने बांधकाम साईटवर काम करणाऱ्या सुपरवायझरने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. दापोडी येथील लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयात (सीएमई)च्या परिसरात ही घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली. 45 वर्षीय रवींद्र सिंग असं गळफास घेऊन मृत पावलेल्या सुपरवायझरचे नाव आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत रवींद्र सिंग हे सीएमई येथे सुरू असलेल्या बांधकाम साईटवर सुपरवायझर म्हणून काम करीत होते. त्यांनी गुरुवारी सायंकाळी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. विकास दुबेचा खेळ खल्लास, ज्या ठिकाणी एन्काउंटर केलं तिथला पहिला VIDEO पोलिसांना घटनस्थळावर एक चिठ्ठी मिळून आली आहे. यामध्ये ठेकेदाराने पगार न दिल्याने आत्महत्या करीत असल्याचं म्हटलं आहे. रवींद्र यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद करण्यात आली नव्हती. पुढील तपास भोसरी पोलीस करीत आहेत. पुण्यात इंजिनियर तरुणाची आत्महत्या दरम्यान,  Whatsappवर  स्टेटस अपलोड करून 24 वर्षांच्या इंजिनियर तरुणानं  इमारतीच्या 11 व्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना पुण्यात घडली आहे. आत्महत्येपूर्वी या तरुणानं Whatsappवर स्टेटर ठेवून आयुष्य संपवण्याचे संकेत दिले होते. ही धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातील मोशी परिसरात घडली आहे. नेमकं 6.15 वाजता काय घडलं? वाचा विकास दुबेच्या एन्काउंटरची INSIDE STORY अक्षयनं चिखली परिसरातील साने चौकात मित्रांसह राहात होता. एका खासगी कंपनीत इंजिनियर पदावर काम करत होता. बुधवारी दुपारी त्यानं इमारतीच्या टेरेसवर जाण्यासाठी सिक्युरिटी गार्डकडे चावी मागितली. मात्र, सिक्युरिटीने दिली नाही. त्यानंतर दुसऱ्या सिक्युरिटी गार्डला फ्लॅट पाहायचा बहाणा केला आणि चावी घेतली. या तरुणानं 11 व्या मजल्यावरून आत्महत्या केली. हा फ्लॅट एक महिन्यापासून बंद आहे. या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या