विकास दुबेचा खेळ खल्लास, ज्या ठिकाणी एन्काउंटर केलं, तिथला पहिला VIDEO

विकास दुबेचा खेळ खल्लास, ज्या ठिकाणी एन्काउंटर केलं, तिथला पहिला VIDEO

विका दुबेला घेऊन जात असताना ताफ्याला अपघात झाला. त्यानंतर दुबे पोलिसांचीच पिस्तुल घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न करत होता.

  • Share this:

 

कानपूर, 10 जुलै : एखाद्या सिनेमात घडवी अशी घटना कानपूरमध्ये कुख्यात गँगस्टर विकास दुबेच्या बाबतीत घडली आहे. दुबेला घेऊन जात असताना ताफ्याला अपघात झाला.त्यानंतर दुबे पोलिसांचीच पिस्तुल घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर पोलिसांनी प्रत्युत्तर दाखल केलेल्या गोळीबारात विकास दुबे ठार झाला.

पोलिसांची हत्या करणारा विकास दुबे गुरुवारी पोलिसांना शरण आला होता. मध्य प्रदेशातून अटक केलेला गँगस्टर विकास दुबेला घेऊन हा ताफा जात होता. आज सकाळी त्याला घेऊन जाणाऱ्या एसटीएफच्या ताफ्याच्या गाडीला अपघात झाला.  ही घटना बर्रा पोलीस स्टेशन परिसरातील आहे. या अपघातादरम्यान कार उलटी झाली. दरम्यान पोलिसांनी पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या विकास दुबेचा एन्काउटर केला.

दुर्घटनेचा फायदा घेऊन जखमी झालेला विकास दुबे एसटीएफ पोलिसांची पिस्तूल हिसकावून पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. पथकातील एका पोलिसानं विकास दुबेवर गोळीबार केला. विकास दुबेला चार गोळ्या लागल्या होत्या. तर पोलीस कर्मचारीही यात जखमी झाले आहे.

विकास दुबे एन्काउंटरदरम्यान गंभीर जखमी झाला होता. विकास दुबेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

कानपूरचे एसएसपी  दिनेश कुमार पी यांनी सांगितले की, 'मुसळधार पाऊस सुरू होता. लवकर पोहोचण्यासाठी ताफा हा सुसाट निघाला होता. त्याचवेळी रस्त्यावर असलेल्या डिव्हाडरला कारने धडक दिली आणि पलटी झाली. घटनेचा फायदा घेऊन विकास दुबे पोलिसांचे पिस्तुल घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. पाठीमागून येणाऱ्या पोलिसांच्या ताफ्याने दुबेला शरण येण्यास सांगितले. पण, त्याने ऐकले नाही त्यानंतर झालेल्या चकमकीत तो जखमी झाली. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.'

Published by: sachin Salve
First published: July 10, 2020, 8:53 AM IST
Tags:

ताज्या बातम्या