कानपूर, 10 जुलै: 8 पोलिसांची हत्या करणाऱ्या विकास दुबेला कानपूरमध्ये घेऊन जाणाऱ्या पोलिसांच्या ताफ्याला अपघात झाला. या अपघातामध्ये कार उलटी झाली आणि विकास दुबे जखमी झाला. जीपमध्ये मध्यभागी बसलेला विकासनं पोलिसांची बंदूक हिसकावून पळ काढण्याचा प्रयत्न केला त्यावेळी पोलिसांना बचावासाठी गोळीबार करावा लागला यादरम्यान विकास दुबेचा एन्काउंटर करण्यात आला. गंभीर जखमी झालेल्या विकास दुबेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पोलिसांच्या ताफ्याला सकाळी 6.15 वाजता झालेल्या अपघातादरम्यान नेमकं काय घडलं? विकास दुबेचा एन्काउंटर झाला की करण्यात आला यासंदर्भात न्यूज 18च्या हाती एक्स्क्लुझिव्ह माहिती आली आहे. सकाळी 6.15 वाजता नेमकं काय घडलं? काय आहे घटनाक्रम मध्य प्रदेशातील उज्जैनी इथे गुरुवारी सकाळी महाकाली मंदिरातून विकास दुबेच्या मुस्क्या आवळण्यात आल्या. संध्याकाळी पोलिसांकडून त्याची चौकशी करण्यात आली. त्यानंतर विकास दुबेला उत्तर प्रदेश पोलिसांच्या हवाली करण्यासाठी उज्जैनी इथून कानपूरच्या दिशेनं प्रवास सुरू झाला. हे वाचा- विकास दुबेचा कबुलीजबाब; त्या रात्री 5 पोलिसांचे मृतदेह जाळण्याच्या होता तयारीत वेगानं घडामोडी घडत असतानाच अचानक शुक्रवारी सकाळी 6.15 च्या सुमारास बर्रा पोलिस स्टेशन परिसरात एसटीएफच्या ताफ्यातील एका गाडीला अपघात झाला. या अपघातादरम्यान गाडी उलटी झाली. या गाडीमध्ये विकास दुबे जीमध्ये मध्यभागी बसला होता. त्यानं बाजूच्या पोलीसाची बंदूक हिसकवून जखमी असतानाही पळ काढण्याचा प्रयत्न केला. अचानक झालेल्या या दुर्घटनेमुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली. पोलिसांनी उलटलेल्या गाडीत विकास दुबेला पाहिलं मात्र त्यानं तिथून पळ काढला होता. पोलिसांनी सर्ज ऑपरेशन सुरू केलं. यादरम्यान विकास दुबे एका ठिकाणी लपून बसल्याचं पोलिसांना दिसलं त्यांनी सरेंडर करण्याचे आदेश दिले. मात्र विकासनं पोलिसांवर गोळीबार सुरू केला.
सुरुवातील पोलिसांनी विकासला समजावलं मात्र तो ऐकत नाही आणि पोलिसांनी स्वत:चा बचाव करण्यासाठी गोळीबार सुरू केला. काही क्षण दोन्हीकडून गोळीबार सुरू होता. त्यातील एका पोलिसाची गोळी विकासला लागली. पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये ठार करण्यात आलं. तातडीनं विकासला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र तोपर्यंत पोलिसांनी विकासला मृत घोषित केलं. कानपूरमधील 8 पोलिसांची हत्या करणारा विकास दुबे पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत ठार झाला.