JOIN US
मराठी बातम्या / पुणे / शरद पवारांबद्दल बकरी ईदसंबंधी आक्षेपार्ह पोस्ट आली अंगाशी, पुणे पोलिसांनी केली मोठी कारवाई

शरद पवारांबद्दल बकरी ईदसंबंधी आक्षेपार्ह पोस्ट आली अंगाशी, पुणे पोलिसांनी केली मोठी कारवाई

या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी एका व्यक्तीला तात्काळ अटक केली आहे. या पोस्टमुळे सोशल मीडियावरही लोकांनी संताप व्यक्त केला होता.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

शिरुर, 22 जुलै : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार आणि मुस्लिम समाजाबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्या प्रकरणी शिरुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी एका व्यक्तीला तात्काळ अटक केली आहे. या पोस्टमुळे सोशल मीडियावरही लोकांनी संताप व्यक्त केला होता. शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुभाष रामदेव जांभळे यानं त्याच्या मोबाईलवरून राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि मुस्लिम धर्मियांच्या बकरी ईद सणाबाबत आक्षेपार्ह पोस्ट करत ती व्हायरल केली होती. ही आक्षेपार्ह पोस्ट वेगळ्या मोबाईलवर पाठवून जनतेच्या मनात चुकीचा संदेश पसरवला. तर मुस्लिम समाजाची बकरी ईदवर असलेली श्रद्धा आणि त्या श्रद्धेचा शरद पवार यांच्यासोबत चुकीच्या पद्धतीने संबंध जोडून समाज्यात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. प्रत्येक पालकासाठी अतिशय महत्त्वाची बातमी, महाराष्ट्र सायबरनं केलं आवाहन याप्रकरणी शिरुर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचे गांभीर्य पाहून आरोपीला तात्काळ अटक करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरुर पोलिस करत आहेत. धक्कादायक! 4 जणांच्या आत्महत्येमागे शिवसेना नगरसेवकाचा हात, पोलिसांनी केली अटक याआधीही शरद पवार यांच्यावर अश्लील भाषेत सोशल मीडियावर केलेली टीका एका पोलीस पाटलाला चांगलीच भोवली होती. चांदवड तालुक्यातील देवरगाव पोलीस पाटील आणि ग्रुपच्या अॅडमीनवर चांदवडच्या वडणेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. माणिक संपत शिंदे असं या पोलीस पाटलाचं नाव असून त्यांच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अनलॉकनंतर आता पुन्हा लॉकडाऊन होणार का? राजेश टोपेंनी दिली महत्त्वाची माहिती शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या बद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर शेअर केला होता. हा मेसेज व्हायरल झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. यानंतर पोलीस पाटील माणिक सपंत शिंदे सह ग्रुप अॅडमिन कमलाकर शिंदेवर भा.द वी 500, 504, 505(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या