सोलापूर, 22 जुलै : सोलापुरातील एकाच कुटुंबातील 4 जणांच्या आत्महत्येप्रकरणी शिवसेनेच्या नगरसेवकाला अटक करण्यात आली आहे. खासगी सावकारीला कंटाळून या कुटुंबाने आत्महत्या केल्याची माहिती पुढे आली होती. पती, पत्नी मुलगा आणि मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी शिवसेनेचे विद्यमान नगरसेवक लक्ष्मण जाधव यांना याप्रकरणी अटक करण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोलापुरातील हांडे प्लॉटमधली ही घटना आहे. पोलीस आयुक्त अंकुश शिंदे आणि उपायुक्त बापू बांगर घटनास्थळी दाखल होत प्रकरणाची चौकशी करत होते. अमोल जगताप यांनी दोन मुलं आणि पत्नीला गळफास देवून स्वतः आत्महत्या केली होती. या घटनेत आत्तापर्यंत एकूण ४ जणांना अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
अनलॉकनंतर आता पुन्हा लॉकडाऊन होणार का? राजेश टोपेंनी दिली महत्त्वाची माहिती
पुण्यातून धक्कादायक बातमी, अलका चौकात आंदोलन करणाऱ्या 'त्या' रुग्णाचा मृत्यू
गेल्या चार महिन्यांपासून बंद असलेला रोजगाराचा अभाव, त्यामुळे सावकाराचं घेतलेलं कर्ज फेडतांना या कुटुंबाची ओढाताण होत होती. त्यातच सावकाराचा कर्ज फेडण्यासाठी सारखा तगादा असल्याने ते कुटुंब त्रासून गेलं होतं. त्यामुळे भविष्यात आपलं काय होईल या विवंचनेत असतानाच त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला असा अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला होता.
राष्ट्रवादी आणि शिवसेना काँग्रेस पक्षावर नाराज, मोठा निर्णय घेण्याची शक्यता
एकाच दिवशी सर्वच कुटुंब संपल्याने परिसरात दु:ख व्यक्त करण्यात येत आहे. या आत्महत्येमागे इतर काही गोष्टी कारणीभूत आहेत का याचाही तपास पोलीस होते. तपासामध्ये हाती आलेल्या माहितीवरून पोलिसांनी चार जणांना अटक केली. यामध्ये शिवसेनेच्या नगरसेवकाचंही नाव आहे.