JOIN US
मराठी बातम्या / पुणे / 'पद्मश्री' पुरस्कार नाकारणार का? सय्यद भाईंनी केला खुलासा

'पद्मश्री' पुरस्कार नाकारणार का? सय्यद भाईंनी केला खुलासा

‘जात, धर्म नाही तर मानवता हाच खरा धर्म आहे. दगडावरची पेरणी अजून सुरूच आहे, थांबलेली नाही.’

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे 26 जानेवारी : मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष सय्यद भाई यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर सय्यद भाई मोदी सरकारने दिलेले पुरस्कार स्विकारणार का असा सवाल विचारला जाऊ लागला. CAA आणि सरकारच्या मुस्लिमांबद्दलच्या भूमिकेवरून जे आरोप झालेत त्यावरून सोशल मीडियावरून हे प्रश्न विचारले जाऊ लागले त्या सर्व प्रश्नांना सय्यद भाई यांनी उत्तर दिलंय. पद्मश्री पुरस्कार हा माझ्या कामाबद्दल मिळाला आहे तो का स्वीकारायचं नाही? असं म्हणत त्यांनी पुरस्कार घेणार असल्याचं सांगितलं. भाई सध्याच्या वातावरणात पुरस्कार स्वीकारतील किंवा नाही या समाज माध्यमात सुरू असलेल्या चर्चेतील हवाच सय्यदभाई यांनी काढून घेतली. ते म्हणाले, मी CAA, NRC बद्दल माहिती घेईन जर कायदा चुकीचा असेल, मुस्लिम विरोधी असेल तर जरूर पुनर्विचार करावा असं सांगेन असं मतही त्यांनी मांडलं. हमीद दलवाई यांच्या मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे शिलेदार असलेल्या सय्यद भाई यांनी तीन तलाकसह मुस्लिम समाजातील इतर अनिष्ट प्रथां विरोधात लढा दिला होता. जात, धर्म नाही तर मानवता हाच खरा धर्म असल्याचं त्यांनी सांगितलं. दगडावरची पेरणी अजून सुरूच आहे म्हणत त्यांनी आशावाद व्यक्त केला. राम मंदिराची उभारणी होणार सुरू, प्रत्येक व्यक्तीमागे द्यावे लागतील इतके रुपये… सुरेश वाडकर यांना पद्मश्री गेली अनेक वर्ष ज्यांनी रसिकांच्या मनावर सुरांनी अधिराज्य गाजवलं अशा ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना यंदाचा देशातील अत्यंत पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आलाय. सुरेश वाडकरांनी आजपर्यंत हिंदी-मराठी- भोजपुरी- कोकणी- ओडिया अशा अनेक भाषांमधील गाणी गायली आणि ती लोकप्रियही झाली. ‘मेघा रे मेघा रे’, ‘चप्पा चप्पा चरखा चले’, ‘ए जिंदगी’ यांसारख्या अनेक सुपरहिट गाण्यांमुळे सुरेश वाडकरांनी चाहत्यांच्या मनावर त्यांच्या आवाजाची छाप सोडलीये.सुरेश वाडकर यांनी संगीताचं प्रशिक्षण देण्यासाठी आजीवासन म्युझिक अकॅडमीची स्थापना केली. CAA ‘शाहीन बाग’ने आणला मोदी सरकारच्या नाकात दम, महिलांचा एल्गार दरम्यान, ‘बीजमाता’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या राहीबाई पोपेरे आणि अहमदनगरच्या आदर्श गाव हिवरेबाजारचे माजी सरपंच पोपटराव पवार यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. राहीबाई पोपेरे यांना कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल पद्मश्री पुरस्कार जाहीर झालाय.

‘देशात 1985 साली लागू झालं संविधान’, महिला मंत्र्यांनी उधळली मुक्ताफळे

निरक्षर असूनही राहीबाईंनी अहमदनगरमधील आदिवासी भागात कृषीक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलीय. जैविक बियाणांची बँक चालवत असल्यामुळे त्या ‘बीजमाता’ म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी आतापर्यंत शंभरहून अधिक देशी बियाणांचं जतन केलंय. तर जलसंधारण क्षेत्रात भरीव कामगिरी केल्याबद्दल हिवरेबाजारचे माजी सरपंच पोपटराव पवार यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या