मराठी बातम्या /बातम्या /देश /अयोध्या येथे राम मंदिराची उभारणी होणार सुरू, प्रत्येक व्यक्तीमागे द्यावे लागतील इतके रुपये...

अयोध्या येथे राम मंदिराची उभारणी होणार सुरू, प्रत्येक व्यक्तीमागे द्यावे लागतील इतके रुपये...

 राम मंदिर ट्रस्टचे गठण 9 फेब्रुवारीपर्यंत होणार आहे

राम मंदिर ट्रस्टचे गठण 9 फेब्रुवारीपर्यंत होणार आहे

राम मंदिर ट्रस्टचे गठण 9 फेब्रुवारीपर्यंत होणार आहे

लखनऊ, 26 जानेवारी : अयोध्या येथील राम मंदिर ट्रस्टचे गठण 9 फेब्रुवारीपर्यंत होणार असल्याचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जाहीर केलं आहे. त्यानंतर तीन महिन्यातच राम मंदिर बांधण्याची सुरुवात होणार आहे. यावेळी योगी आदित्यनाथ यांनी CAA प्रकरणात विरोधकांवर निशाणा साधला. CAA संदर्भात विरोधक जनतेची दिशाभूल करीत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सरकार विरोधकांच्या दबावाखाली येणार नसून ज्यांनी आंदोलनात सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केलं आहे, त्यांच्याकडून वसूली करण्यात येईल, असेही ते यावेळी म्हणाले. CAA विरोधात शांतीपूर्ण विरोध असेल तर तो स्वीकारला जाईल मात्र हिंसेचा स्वीकार केला जाणार नसल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

राम मंदिरच्या उभारणीची तयारी सुरू

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितल्याप्रमाणे अयोध्या मंदिराच्या उभारणीची जोरदार तयारी सुरू आहे. राम मंदिराच्या उभारणीसाठी प्रत्येक व्यक्तीकडून 10-10 रुपयांचा निधी जमा करण्यात येत आहे. प्रत्येकाकडून केवळ 10 रुपये घेतले जाणार आहे.

सुप्रीम कोर्टाने रामजन्मभूमीच्या वादावर 9 नोव्हेंबरला निर्णय दिला होता. या निर्णयावर फेरविचार व्हावा म्हणून काही याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या होत्या. या याचिकांवर सुनावणी कशी घ्यायची याचा निर्णय खंडपीठाने घेतला आणि सर्व फेरविचार याचिका फेटाळल्या. वादग्रस्त रामजन्मभूमीची जागा रामलल्लाची असल्याचं सुप्रीम कोर्टाने मान्य केलं होतं. या निर्णयाचा फेरविचार व्हावा या अर्थाच्या एकूण 18 याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. या सर्व याचिकांवर गुरुवारी दुपारी सरन्यायाधीशांसह  पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाने चेंबरमध्ये सुनावणी घेतली. चीफ जस्टिस शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालच्या या खंडपीठात न्या. धनंजय चंद्रचूड, न्या.अशोक भूषण, न्या. एस अब्दुल नजीर आणि न्या संजीव खन्ना यांनी सुनावणी घेतली.

अन्य बातम्या

निर्भया प्रकरण : दोषी विनयने तुरुंगात केलेल्या 11 पेंटिंग्सची विक्री

पुण्यात ‘या’ ठिकाणी मिळेल शिवभोजन थाळी

First published:

Tags: Ayodhya case, Cm yogi adityanath, Ram Mandir