JOIN US
मराठी बातम्या / पुणे / VIDEO: पुण्यात वाढदिवसाच्या नावाखाली धिंगाणा! बर्थडे बॉयवरच केला अंड्यांचा वर्षाव

VIDEO: पुण्यात वाढदिवसाच्या नावाखाली धिंगाणा! बर्थडे बॉयवरच केला अंड्यांचा वर्षाव

नारायणगाव येथे मुक्ताई मंदिरासमोर वाढदिवसाच्या नावाखाली धिंगाणा घालणाऱ्या आणि बर्थडे बॉयवर अंडी फेकून मारणाऱ्या 6 जणांवर पोलिसांनी आता गुन्हा दाखल केला आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 15 डिसेंबर: पुणे तिथं काय उणे! असं म्हटलं जातं. पुणे जिल्ह्यात अशी एक अजब घटना समोर आली आहे. बर्थडे बॉयच्या अंगावर चक्क त्याच्या मित्रांनी अंड्यांचा वर्षाव केला. जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथे ही घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. नारायणगाव येथे मुक्ताई मंदिरासमोर वाढदिवसाच्या नावाखाली धिंगाणा घालणाऱ्या आणि बर्थडे बॉयवर अंडी फेकून मारणाऱ्या 6 जणांवर पोलिसांनी आता गुन्हा दाखल केला आहेत. हेही वाचा… आमदार रवी राणांवर यावरून संतापले विधानसभा अध्यक्ष, म्हणाले सभागृहाच्या बाहेर जा! नारायणगाव येथील सकलेन नासिर शेख या तरुणाचा नुकताच 18 वा वाढदिवस झाला. मुक्ताई मंदिराच्या पुढे सकलेन याच्या मित्रांनी एकमेकांना अंडी फेकून धिंगाणा घातला. आता हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. त्यावर मोठ्या प्रमाणात तिव्र प्रतिक्रिया देखील उमटताना दिसत आहेत.

संबंधित बातम्या

नारायणगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस अधिकारी दत्तात्रय गुंड यांनी या गैरप्रकाराची तात्काळ दखल घेवून धिंगाणा घालणाऱ्या तरुणांवर गुन्हे दाखल केले आहेत. सकलेन आत्तार, साकीर आमीन जमादार, आरमान खालीद शेख, मोईन अकलाक आत्तार, मोसीन फिरोज ईनामदार, जाहिद पिरमहम्मद पटेल. सर्व (रा. मुस्लिम मोहल्ला, नारायणगाव) अशीही आरोपींची नावं आहेत. काही दिवसांपूर्वी जुन्नर तालुक्यात असाच एक प्रकार समोर आला होता. चक्क तलवारीनं केक कापून एका पैलवानानं आपला वाढदिवस साजरा केला होता. या घटनेचाही व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नारायणगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. हेही वाचा… ब्रेन ट्युमरचं ऑपरेशन सुरू असताना 9 वर्षाची सौम्या वाजवत होती पियानो, पाहा VIDEO एका आरटीआय कार्यकर्त्यांनं केलेल्या पाठपुराव्यानंतर तलवारीनं केक कापणारा पैलवान राहुल बेल्हेकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. वाढदिवस साजरा करताना तलवार या घातक शस्त्र बाळगून गावात दहशत निर्माण करण्याच प्रयत्न करण्यात आल्याचंही पोलिसांनी सांगितलं होतं. पोलिसांनी या पैलवानावर गुन्हा दाखल केला आहे. यात वापरलेली तलवारही ताब्यात घेतली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या