JOIN US
मराठी बातम्या / पुणे / पुणे- सोलापूर महामार्गावर सेक्स रॅकेटचा पर्दाफाश! मराठी तरुणीसह तिघींची सुटका

पुणे- सोलापूर महामार्गावर सेक्स रॅकेटचा पर्दाफाश! मराठी तरुणीसह तिघींची सुटका

मराठी तरुणीसह तीन महिलांची सुटका करण्यात आली

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सुमित सोनवणे (प्रतिनिधी), दौंड, 4 नोव्हेंबर: पुणे-सोलापूर महामार्गावरील (Pune-Solapur highway) त्रिमुर्ती हॉटेलवर (Trimurti Hotel) पोलिसांना छापा टाकून सेक्स रॅकेटचा (Sex Racket) पर्दाफाश केला आहे. यवत पोलिसांनी (Pune Police) ही कारवाई केली असून मराठी तरुणीसह तीन महिलांची सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी हॉटेल मालकासह तिघांना अटक केली आहे. हेही वाचा.. हवेत फायरिंग करत औरंगाबादेत दिवसाढवळ्या बिल्डरचं फिल्मी स्टाईल अपहरण मिळालेली माहिती अशी की, बोरी भडक गावच्या हद्दीत पुणे-सोलापूर महामार्गावर असलेले त्रिमूर्ती हॉटेल या ठिकाणी देह विक्री व्यवसाय सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. दौंडचे पोलीस उपअधीक्षक राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली यवत पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्या पथकाने त्रिमुर्ती हॉटेलवर छापा टाकला. त्रिमुर्ती हॉटेलमध्ये वेश्या व्यवसायासाठी ठेवलेल्या तीन महिलांची सुटका करण्यात आली. तर हॉटेल चालक प्रभाकर गोपाल शेट्टी व अन्य दोन्ही साथीदारांना अटक करण्यात आलेली आहे. पुढील तपास पोलिस उपअधीक्षक राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील करत आहेत. यापूर्वीही झाली होती कारवाई… पुणे-सोलापूर महामार्गावरील एका हॉटेलमध्य गेल्या आठवड्यात अशीच कारवाई झाली होती. दौंड पोलिसांनी पांढरेवाडी गावाच्या हद्दीत अनुराधा हॉटेल (Anuradha Hotel)येथे छापा टाकला होता. या कारवाईत पोलिसांनी दोन जणांना अटक केली होती तर 3 महिलांचा सूटका केली होती. अनुराधा हॉटेलमध्ये देहविक्री व्यवसाय केला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलीस कॉन्स्टेबल अमोल गवळी यांना मिळाली होती. या घटनेबाबत त्यांनी पोलीस निरीक्षक सुनील महाडीक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांना दिली. त्यानंतर पोलिसांनी हॉटेलवर छापा टाकण्याचं नियोजन केलं. हेही वाचा..  बोगस क्रीडा प्रमाणपत्र प्रकरणी नगर, औरंगाबाद जिल्ह्यात मोठी कारवाई बनावट ग्राहक पाठवून त्याच्याकडून खात्री केली. सेक्स रॅकेटची माहिती खरी ठरली. नंतर पोलिसांनी छापा टाकून हॉटेलमध्ये वेश्या व्यवसायासाठी ठेवलेल्या तीन महिलांची सुटका केली. त्यापैकी एक महिला महाराष्ट्रीयन तर दोन महिला पश्चिम बंगालमधील आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या