BREAKING: हवेत फायरिंग करत औरंगाबादेत दिवसाढवळ्या बिल्डरचं फिल्मी स्टाईल अपहरण

BREAKING: हवेत फायरिंग करत औरंगाबादेत दिवसाढवळ्या बिल्डरचं फिल्मी स्टाईल अपहरण

हवेत फायरिंग करीत औरंगाबाद शहरात दिवसाढवळ्या एका बांधकाम व्यावसायिकाचं अपहरण झाल्याची धक्कादायक घटना

  • Share this:

सचिन जिरे, (प्रतिनिधी)

औरंगाबाद, 4 नोव्हेंबर: हवेत फायरिंग करीत औरंगाबाद शहरात दिवसाढवळ्या एका बांधकाम व्यावसायिकाचं अपहरण झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शहराती देवा नगरी भागात बुधवारी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

नाझीम पठाण राउफ पठाण असं अपहरण झालेल्या बांधकाम व्यावसायिकाचं नाव आहे. पांढऱ्या रंगांच्या चारचाकी वाहनातून आलेल्या तीन चार अज्ञात हल्लेखोरांनी अपहरण केल्याची माहिती समोर आली आहे. घटनास्थळी पोलीस पोहोचले असून पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा...बोगस क्रीडा प्रमाणपत्र प्रकरणी नगर, औरंगाबाद जिल्ह्यात मोठी कारवाई

मिळालेली माहिती अशी की, पांढऱ्या चारचाकी वाहनातून आलेल्या तीन ते चार हल्लेखोरांनी हवेत गोळीबार करत बांधकाम व्यावसायिकांचे अपहरण केले. शहरातील देवानगरी जवळील पीडब्ल्यूडी कॉलनीत घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस अपहरणकर्त्यांचा शोध घेत आहे.

या धक्कादायक घटनेप्रकरणी अधिक माहिती अशी की, बँकेत नोकरी करीत असलेले मदन अवधूत भोसले यांच्या घराच बांधकामचा ठेका पठाण यांनी घेतला होता. आज सकाळी ते साईडवर आले व कामगारांकडून बांधकामाची माहिती घेत असताना अचानक एका पांढऱ्या रंगाच्या एका चारचाकी वाहनातून तीन ते चार व्यक्ती त्या ठिकाणी आले. त्यांनी पठाण यांच्याशी हस्तांदोलन केलं. त्याचवेळी त्यांना धक्का देत यांना गाडीमध्ये ढकलत हवेत गोळीबार करून तेथून पसार झाले.

बंदुकीच्या गोळीचा आवाज आल्याने कामगारांनी बाहेर येऊन पाहिले असता हल्लेखोरांनी तोपर्यंत पळ काढला होता. या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त सुरेश वानखेडे, सातारा पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुरेंद्र मळाले, गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल गायकवाड यांच्यासह पथकांनी धाव घेतली व घटनास्थळाची पाहणी केली.

दरम्यान, सध्या आयपीएलचा (IPL)धुमधाम सुरू असून याच सामन्यावर विविध ठिकाणी एजंट नेमून कोट्यवधींचा सट्टा चालविणाऱ्या सट्टा किंग म्हणून जिल्ह्यात परिचित असलेल्या मनोज दगडाला (Manoj Dagada) औरंगाबाद गुन्हे शाखेच्या पथकाने (Aurangabad Police) बेड्या ठोकल्या आहेत. आज दुपारी त्याला न्यायालयासमोर हजार करण्यात येणार आहे.

हेही वाचा..अर्णब गोस्वामी अटक प्रकरणावर अमित शहांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....

औरंगाबाद जिल्ह्यात अत्यंत छुप्या पद्धतीने अनेक ठिकाणी आयपीएलच्या सामन्यावर सट्टा लावण्यासाठी दगडाचे एजंट कार्यरत होते. जिन्सी पोलिसांनी गेल्या महिन्यात अशाच एका एजंटला अटक केली होती. त्या नंतर दगडाचे नाव समोर आले होते. तर काची वाड्यातून पिता-पुत्रांना अटक केली होती. तर दोन आठवड्यांपूर्वीच सिटीचौक पोलिसांनी रोजेबाग परिसरात एका फ्लॅटमध्ये छापा मारून आयपीएल सामन्यावर सट्टा लावण्यासाठी सुरू असलेला कॉल सेंटरवर छापा मारला होता.

Published by: Sandip Parolekar
First published: November 4, 2020, 1:04 PM IST
Tags:

ताज्या बातम्या