बोगस क्रीडा प्रमाणपत्र प्रकरणी नगर, औरंगाबाद जिल्ह्यात मोठी कारवाई

बोगस क्रीडा प्रमाणपत्र प्रकरणी नगर, औरंगाबाद जिल्ह्यात मोठी कारवाई

क्रीडा प्रमाणपत्र (Fake Sport certificate case) प्रकरणी नागपूर-मानकापूर पोलिसांची (Nagpur Police) राज्यभरात धडक कारवाई सुरू आहे.

  • Share this:

नागपूर, 4 नोव्हेंबर: बहुचर्चित क्रीडा प्रमाणपत्र (Fake Sport certificate case) प्रकरणी नागपूर-मानकापूर पोलिसांची (Nagpur Police) राज्यभरात धडक कारवाई सुरू आहे. या प्रकरणी पोलिसांनी नगर, औरंगाबाद (Aurangabad)जिल्ह्यात मोठी कारवाई केली आहे. आणकी एका म्होरक्याला पोलिसांनी अटक केली आहे.

नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथून रमेश गाडे याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. रमेश गाडे याच्या घरी अनेक बोगस कागदपत्रे सापडली आहेत. ट्रॅपोलिन, आईस हॉकी पाठोपाठ नेटबॉल, कराटे, किक बॉक्सिंगची बोगस क्रीडा प्रमाणपत्रांचा त्यात समावेश आहे.

हेही वाचा...औरंगाबाद पोलिसांची मोठी कारवाई, IPL सामन्यावर सट्टा लावणारा बुकी दगडा अटकेत

रमेश गाडे यानं पुणे, नाशिक,औरंगाबाद येथे अनेक बनावट प्रमाणपत्र विकल्याची धक्कादायक माहिती पोलिसांना चौकशीत मिळाली आहे.

दुसरीकडे, या प्रकरणी औरंगाबाद शहरातील कॅनॉट गार्डन परिसरात कारवाई करण्यात आली आहे. एका झेरॉक्स (Xerox)सेंटरमधून पोलिसांनी दोन संगणक जप्त केले आहेत. मानकापूर पोलिसांनी बोगस क्रीडा प्रमाणपत्र प्रकरणी आतापर्यंत 6 जणांना अटक केली.

कोण आहे रमेश गाडे?

रमेश गाडे (वय-30) हा राहुरी कृषी विद्यापीठात चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहे. बनावट क्रीडा प्रमाणपत्रांची विक्री करणाऱ्या रॅकेटमध्ये तो सहभागी झाला. राहुरी कृषी विद्यापीठात काम करताना आरोपी रमेश गाडे यानं बनावट क्रीडा प्रमाणपत्र विक्रीचा बाजार मांडून लाखो रुपयांची अवैध कमाई केली. तपासात त्याचं नाव पुढे आल्यानंतर पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनात मानकापूर पोलिसांनी अहमदनगर गाठून टाकळी वहान (ता. श्रीरामपूर) येथून आरोपीला अटक केली. यावेळी मारलेल्या छाप्यात पोलिसांनी त्याच्या घरातून अनेक कागदपत्रे, आधार कार्ड आणि पाच क्रीडा प्रकारातील बनावट प्रमाणपत्र जप्त केली आहेत.

हेही वाचा...भरवस्तीत दिवाळीआधी फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, 3 जणांचा होरपळून मृत्यू

दरम्यान, बनावट क्रीडा प्रकरणाचा मुख्य सुत्रधार अंकुश राठोड याला पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे. या प्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. तर दोन आरोपी अद्याप फरार आहेत. पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे बनावट क्रीडा प्रमाणपत्र विकत घेऊन आतापर्यंत 32 जणांनी शासकीय नोकऱ्या मिळवल्या असल्याची माहिती समोर आली आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: November 4, 2020, 12:47 PM IST

ताज्या बातम्या