JOIN US
मराठी बातम्या / पुणे / पुण्यातली धक्कादायक घटना: 14 वर्षं होते प्रेमात; पण लग्नाला नकार दिल्याने प्रियकरानेच डोक्यात दगड घालून केला खून

पुण्यातली धक्कादायक घटना: 14 वर्षं होते प्रेमात; पण लग्नाला नकार दिल्याने प्रियकरानेच डोक्यात दगड घालून केला खून

लग्नास नकार दिल्याने प्रियकराने प्रेयसीचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रागाच्या भरात केलेल्या या घटनेमुळे पुणे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

जाहिरात

दीड तासाच्या पाठलाग करून अखेर आरोपीच्या मुसक्या अवळण्यात नेकनूर पोलिसांना यश आले आहे.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 1 एप्रिल: पुण्यात लग्नास नकार दिल्याने प्रियकराने प्रेयसीचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मनीषा गेडाम असं मृत मुलीचं नाव आहे. गेल्या 14 वर्षांपासून दोघांमध्ये प्रेम होतं. मात्र तिने लग्नाला नकार दिल्याने रागाच्या भरात प्रियकराने तिचा खून केला. या प्रकरणी चंदननगर पोलिसांनी सागर गुडाव याला अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अमरावतीचे रहिवासी असलेल्या मनीषा आणि सागर दोघांमध्ये गेल्या 14 वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र कुटुंबाच्या विरोधामुळे मनीषाने सागरसोबत लग्न करण्यास नकार दिला होता. सागरने तिच्यामागे लग्नासाठी तगादा लावला होता. तिला सारखा फोन करून त्रास देत होता. भेटायचं आहे सांगत होता. मात्र मनीषा त्याला दाद देत नव्हती. तरी सागरने त्याचे प्रयत्न सुरुच ठेवले होते. शेवटचं भेटायचं सांगत मनीषाला समजवत भेटायला बोलवलं. नुसतं भेटायचं नाही तर दोघांनी महाबळेश्वरला जाण्याचा प्लान आखला. मात्र सागरच्या मनात दूसरंच काहीतरी होतं. त्याच्या मनात लग्नाला नकार दिला म्हणून राग धगधगत होता. 13 मार्चला दोघेही भेटले आणि सागर मनीषाला दुचाकीवरुन घेऊन निघाला आणि भाटघर धरणाच्या दिशेने गेला. त्या ठिकाणी गेल्यावर मनीषा बेसावध असताना तिच्या डोक्यात दगड घालून तिचा खून केला. त्यानंतर सागर घटनास्थळावरून फरार झाला. पोलीस त्याचा 17 दिवसांपासून शोध घेत होते अखेर 31 मार्चला त्याला बेड्या ठोकल्या.

धक्कादायक! सात वर्षाच्या मुलावर बलात्काराचा आरोप, प्रकरण ऐकून न्यायाधीशही अवाक

संबंधित बातम्या

पोलिसांनी आरोपी सागर गुडावला अटक केली असून त्याची कसून चौकशी करत आहेत. या गुन्ह्यात त्याला कुणी मदत केली याचा तपास करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या