धक्कादायक! सात वर्षाच्या मुलावर बलात्काराचा आरोप, प्रकरण ऐकून न्यायाधीशही अवाक

अवघ्या सात वर्षाच्या एका चिमुरड्यावर बलात्काराचा (Rape) आरोप ठेवण्यात आला आहे. या घटनेची माहिती उघड होताच खळबळ उडाली असून या प्रकरणाची सध्या सोशल माीडियावर (Social Media) जोरदार चर्चा सुरु आहे.

अवघ्या सात वर्षाच्या एका चिमुरड्यावर बलात्काराचा (Rape) आरोप ठेवण्यात आला आहे. या घटनेची माहिती उघड होताच खळबळ उडाली असून या प्रकरणाची सध्या सोशल माीडियावर (Social Media) जोरदार चर्चा सुरु आहे.

  • Share this:
    न्यूयॉर्क, 1 एप्रिल : सातव्या वर्षी मुलं प्राथमिक शाळेत शिकत असतात आणि जवळपास प्रत्येक गोष्टींसाठी ते पालकांवर अवलंबून असतात. पण, अवघ्या सात वर्षाच्या एका चिमुरड्यावर बलात्काराचा (Rape) आरोप करण्यात आला आहे. या घटनेची माहिती उघड होताच खळबळ उडाली असून या प्रकरणाची सध्या सोशल माीडियावर (Social Media) जोरदार चर्चा सुरु आहे. 'डेली मिरर' नं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार अमेरिकेतील (USA) न्यूयॉर्कमधील (New York) ही घटना आहे. या प्रकरणाची पहिल्यांदा तक्रार 26 नोव्हेंबर रोजी दाखल करण्यात आली होती. त्यानंतर 23 मार्च रोजी या प्रकरणात खटला दाखल करण्यात आला आहे. ही घटना कुठे घडली तसंच यामधील पीडित व्यक्तीचं वय काय आहे? याबाबतची कोणतीही माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला आहे. तसेच या प्रकरणातील आरोपी आणि पीडित व्यक्तींचे काही नाते होते का याचीही कोणती माहिती सध्या उपलब्ध नाही. या प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या चिमुरड्यावर आता कौटुंबिक न्यायालयात (Family Court) खटला चालणार आहे. न्यूयॉर्क शहराचे एटर्नी अँथनी यांनी या खटल्यावर विश्वास ठेवणे अशक्य असल्याचं म्हंटलं आहे. 'सात वर्षाचा मुलगा बलात्कार कसा करु शकतो? त्याचं वय खूपच कमी आहे,' असे मत त्यांनी व्यक्त केलं आहे.  या प्रकरणामुळे त्याचं आयुष्य खराब होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. अल्पवयीन मुलानं बलात्कार कसा केला हे कोर्टात सिद्ध करावं लागेल. या प्रकरणात त्या मुलाला मोठा मानसिक त्रास (Mental Torture) सहन करावा लागेल,' असंही अँथनी यांनी स्पष्ट केले. ( छळ, बलात्कार आणि खून... हे यूट्यूबर्स हिट्स मिळवण्यासाठी गाठत आहेत विकृतीचं टोक ) अमेरिकेतील कायदा काय सांगतो? अमेरिकेतील कायद्यानुसार सहा वर्षांच्या वरील मुलावर अल्बानी कयद्याच्या (Albany Law) अंतर्गत खटला दाखल केला जातो. या कायद्याअंतर्गत येणारी किमान वयोमर्यादा 12 वर्ष असावी यासाठी तेथील सामाजिक संस्थांचे प्रयत्न सध्या सुरु आहेत.
    Published by:News18 Desk
    First published: