दिल्लीमध्ये कोरोना बाधित रुग्णाची केस पहिल्यांदा 2 मार्चला समोर आली होती. कोरोना बाधित रुग्ण हा इटलीतून आला होता.
पुणे, 18 फेब्रुवारी : चीनमधून (China) जगभर पसरलेल्या कोरोनाव्हायरशी (Coronavirus) संपूर्ण जग लढा देतो आहे. भारत या लढ्यात यशस्वी होताना दिसतो आहे. चीनहून भारतात परतलेल्या केरळातील कोरोनाव्हायरसच्या रुग्णांची प्रकृती सुधारते आहे, तर आता महाभयंकर अशा या चिनी व्हायरसला रोखेल अशी प्रतिबंधात्मक लसही (preventive vaccine) पुण्यात (pune) तयार झाली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, पुण्यातील सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाने (Serum Institute of India) कोरोनाव्हारसवर प्रतिबंधात्मक लस विकसित करण्यात यश मिळवलं आहे. अमेरिकन बायोटेक्नॉलॉजी कंपनी कोडाजेनिक्सच्या (American biotechnology firm Codagenix) मदतीनं ही लस विकसित करण्यात आली आहे. ही लस प्राथमिक स्तरावर वैद्यकीय चाचणीसाठी उपलब्ध आहे. 6 महिन्यांनंतर या लसीचं ह्युमन ट्रायल होईल म्हणजे एखाद्या व्यक्तीवर चाचणी केली जाईल. हेदेखील वाचा - चीनपाठोपाठ आता फ्रान्समध्ये नवा व्हायरस, ‘कोरोना’नंतर टोमॅटो व्हायरसची दहशत सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला यांनी टाइम्सशी बोलताना सांगितलं की, “प्रचंड रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करणारी ही लस आहे. 6 महिन्यांतच ती मानवी चाचणीसाठी तयार होईल. भारताची ही अशी पहिली लस असेल जी इतक्या वेगानं या टप्प्यापर्यंत विकसित करण्यात यश मिळालं आहे” “मानवी चाचणीनंतर या लसीला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून मंजुरी मिळवाली लागेल. त्यानंतर कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी तिचा वापर करण्यात येईल. मानवी शरीरावर लसीच्या संशोधनासाठी एक वर्ष लागेल. 2022 च्या सुरुवातीला या लसीची निर्मिती होईल, अशी अपेक्षा आहे. ही लस विकसित झाल्यानं जागतिक स्तरावर पसरलेल्या साथीचा रोगाचा सामना करण्यात भारत किती सक्षम आहे हेच यातून दिसतं, असंही पूनावाला म्हणाले. हेदेखील वाचा - अखेर चीनला Coronavirus वर इलाज मिळाला, काय आहे सत्य? चीनमध्ये कोरोनाव्हायरसमुळे 1,868 जणांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण 72,436 व्हायरसची लागण झाली आहे, अशी माहिती चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने दिली आहे.