चीनपाठोपाठ आता फ्रान्समध्ये नवा व्हायरस, ‘कोरोना’नंतर टोमॅटो व्हायरसची दहशत

चीनपाठोपाठ आता फ्रान्समध्ये नवा व्हायरस, ‘कोरोना’नंतर टोमॅटो व्हायरसची दहशत

फ्रान्समध्ये (France) टोमॅटोना (Tomato) व्हायरसची लागण झाली आहे. या घातक विषाणूवर (Virus) काही उपचार नाही, असं कृषी मंत्रालयाने सांगितलं आहे.

  • Share this:

पॅरिस, 18 फेब्रुवारी : एकिकडे जगभरात कोरोनाव्हायरसची (Coronavirus) दहशत आहे, तर दुसरीकडे आता फ्रान्समध्ये (France) एका नव्या व्हायरसने (Virus) डोकं वर काढलं आहे. मात्र फ्रान्समधील या व्हायरसने माणसांवर नाही तर टोमॅटोवर (Tomato) हल्ला केला आहे. फ्रान्समध्ये टोमॅटोच्या शेतीवर व्हायरसने हल्ला केल्यानं संपूर्ण शेत नष्ट होण्याची शक्यता आहे.

फ्रान्सच्या कृषी मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, फिनिस्टरमध्ये टोमॅटोच्या झाडांवर एक घातक विषाणू संक्रमित झाला आहे. या संक्रमणामुळे पूर्ण शेत उद्धवस्त होण्याची शक्यता आहे. कृषी मंत्रालयाने सांगितलं की, या घातक विषाणूच्या संक्रमणावर कोणाताही उपचार नाही, त्यामुळे टोमॅटोच्या शेतीला पूर्णपणे वेगळं करण्यात आलं आहे. तसंच टोमॅटो असलेले ग्रीनहाऊसही नष्ट केले जाणार आहेत.

या विषाणूची लागण झाल्यानंतर टोमॅटो खाण्यालायक राहत नाही आणि त्यांच्यावर डाग पडतात. या विषाणूचा माणसांवर कोणताही दुष्परिणाम होत नाही. मात्र टोमॅटोच्या झाडांना विषाणूची लागण झाल्याने टोमॅटोची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठं नुकसान सहन करावं लागणार आहे.

फ्रान्सप्रमाणेच इटली आणि स्पेनमध्येही टोमॅटोच्या झाडांना या व्हायरसची लागण झाली आहे. युरोपियन युनियनमध्ये स्पेन आणि इटली टोमॅटोचं सर्वाधिक उत्पादन घेणारे देश आहेत. मात्र या ठिकाणीदेखील टोमॅटोंना विषाणूची लागण झाल्याने शेत नष्ट केलं जात आहे.

युरोप आणि अमेरिकामध्ये पसरण्यापूर्वी या घातक विषाणूबाबत सर्वात आधी 2014 साली इज्राइलमध्ये माहिती झाली होती. मात्र जुलै 2018 साली ब्रिटनमध्ये या विषाणूचं पहिलं प्रकरण समोर आलं होतं. त्यानंतर टोमॅटोची बियाणं आणि झाडांची चाचणी आणि निरीक्षण केलं जाईल, असं फ्रान्सने फेब्रुवारीच्या सुरुवातीला म्हटलं होतं. तरीदेखील फ्रान्समध्ये या घातक विषाणूने आपले हातपाय पसरलेच.

अन्य बातम्या

कोरोनाची आता खिशालाही झळ, चीनमधून भारतात येणाऱ्या औषधांच्या किंमती वाढणार

अखेर चीनला Coronavirus वर इलाज मिळाला, काय आहे सत्य?

First published: February 18, 2020, 2:37 PM IST

ताज्या बातम्या