मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

अखेर चीनला Coronavirus वर इलाज मिळाला? काय आहे सत्य?

अखेर चीनला Coronavirus वर इलाज मिळाला? काय आहे सत्य?

कोरोनाव्हायरसवर उपाय सापडला असल्याचा दावा चीनने केला आहे. त्यामुळे चीनसमोर आशेचा नवा किरण आला आहे.

कोरोनाव्हायरसवर उपाय सापडला असल्याचा दावा चीनने केला आहे. त्यामुळे चीनसमोर आशेचा नवा किरण आला आहे.

कोरोनाव्हायरसवर उपाय सापडला असल्याचा दावा चीनने केला आहे. त्यामुळे चीनसमोर आशेचा नवा किरण आला आहे.

  • Published by:  Manoj Khandekar
बीजिंग, 15 फेब्रुवारी : चीनमध्ये कोरोनाव्हायरसमुळे संपूर्ण जवजीवन विस्कळीत झालं आहे. चीनवरील कोरोनाव्हायरसच संकट कमी होण्याचं नाव घेत नाही आहे. या व्हायरसमुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.  कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या 1500 हून अधिक झाली आहे. आणि ही वाढत जाण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. संपूर्ण देशात या व्हायरसचा प्रभाव पडत असून अनेक देश चिंतेत आहेत. चीनमधून सुरुवात झालेल्या या व्हायरसमुळे शी जिनपिंग सरकारला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे शी जिनपिंग यांच्या नेतृत्वार आणि व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. व्हायरसच्या या चर्चांमध्येच आता व्हायरस संदर्भातील नवी माहिती समोर आली आहे. चीनने कोरोना व्हायरसवर उपाय शोधून काढला आहे, अशी बातमी येत आहे. या बातमीत असा दावा केला जात आहे की, डिसेंबरमध्ये पहिल्यांदा चीनमध्ये कोरोना व्हायरस आढळून आला आणि त्यानंतर लगेचच दीड महिन्यांनी चीनने व्हायरसवर उपाय शोधून काढला आहे.  कोरोना व्हायरसची लागण झालेले जे रुग्ण आता बरे झाले आहेत, त्यांच्या मदतीने कोरोना व्हायरस झालेल्या इतर रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत, असंही सांगितलं जात आहे. चीनमधील वृत्तपत्र चायना डेली ने चीनच्या या दाव्यासंदर्भात एक रिपोर्ट प्रसिद्धी केला आहे. या रिपोर्टनुसार कोरोनाव्हायरसवर उपचार करणं शक्य असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे चीनसमोर आशेचा नवा किरण आल्याचं दिसत आहे. हे वाचा - नवरा IAS आणि नवरी IPS, व्हॅलेंटाइन डेच्या मुहूर्तावर प्रेमविवाह केला पण... चायना डेलीच्या रिपोर्टनुसार, कोरोनाव्हायरसवर उपाय करण्यासाठी हा सर्वात इफेक्टिव्ह उपाय असल्याचं सांगण्यात येत आहे. यात असाही दावा करण्यात आला आहे की, या उपायाचा वापर करून याआधी कोरोनाव्हायरसची लागण झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. आणि ते रुग्ण या उपचारांनी बरेही झाले आहेत. ब्लड प्लाझ्मा ने होऊ शकतो कोरोना व्हायरसवर उपचार चीनमधील सरकारी मेडिकल कंपनी नॅशनल बायोटेक ग्रुपने दावा केला आहे की, ब्लड प्लाझ्माने कोरोनाव्हायरसची लागण झालेल्या रुग्णांवर उपचार करता येऊ शकतात. कंपनीने असाही दावा केला आहे की, 8 फेब्रुवारी नंतर कोरोनाव्हायरसची लागण झालेल्या 10 रुग्णांवर यापद्धतीने उपचार करण्यात आले आहेत. आता ते रुग्ण या उपचारांच्या मदतीने बरेही झाले आहेत. या पद्धतीच्या वापरानंतर मिळालेल्या रिझल्ट्समुळे या मेडिकल बायोटेक कंपनीचा या उपचारपद्धतीवरील विश्वास आणखीन वाढला आहे. आणि त्यामुळेच ही उपचारपद्धती कोरोनाव्हायरसवरची विश्वासात्मक उपचारपद्धत मानली जात आहे. कशाप्रकारे केला जाणार ब्लड प्लाझ्माने उपचार चीनमध्ये कोरोनाव्हायरसची लागण दूर करण्यासाठी अशा व्यक्तीचा ब्लड प्लाझ्मा ( संक्रमित केलेलं रक्त ) घेतला जातो ज्याला याआधी कोरोनाव्हायरसची लागणी झाली होती आणि ती व्यक्ती उपचारांनंतर बरी झाली आहे. नॅशनल बायोटेक ग्रुपने सांगितल्या प्रमाणे, लागण झाल्यानंतर बरी झालेल्या व्यक्तीच्या रक्तामध्ये हाय अँटीबॉडीज असतात. अशा लोकांच्या संक्रमित रक्ताने आजारी व्यक्तींवर उपचार करणं शक्य आहे. कंपनीने दावा केला आहे की, या उपचारपद्धतीने उपचार केल्यानंतर अवघ्या 24 तासात त्याचे परिणाम दिसू लागतात. ज्या रुग्णांना ब्लड प्लाझ्मा ट्रिटमेंट देण्यात आली त्यांचा आजार 24 तासात कमी होताना दिसून आला. चीन आता या ट्रिटमेंटचा वापर करताना दिसत आहे. यापद्धतीने क्लिनीकल ट्रायल सुरू आहेत. कमीत कमी 77 रुग्णांवर ट्रायल सुरू आहेत. हेही वाचा - ATM च्या वापरावर मोजावं लागणार ज्यादा शुल्क उपचारांसाठी जमा केले जात आहेत ब्लड प्लाझ्मा चीनमधील नॅशनल बायोटेक ग्रुप कंपनी आता अशा लोकांचे ब्लड प्लाझ्मा जमा करत आहेत ज्यांना याआधी कोरोनाव्हायरस झाला होता आणि आता ते बरे झाले आहेत. त्यामुळे आता व्हायरसमधून बरे झालेल्या जास्तीत जास्त लोकांना पुढे येण्यासाठी आवाहन केलं जात आहे. लोकांना आपलं रक्त डोनेट करण्यासाठी आवाहन केलं जात आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, या उपचारपद्धतीने कोरोनाव्हायरस झालेले रुग्ण बरे झाले आहेत. त्यांच्या शरीरामध्ये ताकदवर एँटीबॉडीज आढळल्या आहेत ज्या व्हायरसला नष्ट करू शकतात. अजून कोरोनाव्हायरवर उपाय म्हणून कोणत्याही वॅक्सीनचा शोध लागला नाही. यावर काही औषधही सापडलेल नाही. त्यामुळे ब्लड प्लाझ्मा पद्धतीने केला जाणारा उपचार हा उपयोगी मानला जात आहे. या उपचारामुळे कोरोनामुळे होणाऱ्या मृतांच्या संख्येत घट होण्याची शक्यता आहे.
First published:

Tags: Coronavirus

पुढील बातम्या