पुणे, 04 जुलै : कोरोना निर्मूलन आढावा बैठकीत पुणे शहराच्यावतीने विविध मुद्दे मांडून राज्य सरकारकडे मागण्या केल्या आहेत. पुण्यातील कोरोना विषाणू निर्मूलन आढावा बैठक पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात संपन्न झाली. यावेळी खालीलप्रमाणे मुद्दे आणि मागण्या आपल्या पुणे शहराच्यावतीनं महापौरांकडून करण्यात आल्या. - आजचा रुग्ण दुपटीचा रेट पाहता जुलैअखेर रुग्णांची संख्या 47 हजारांच्या पुढे जाईल. याचा विचार करता आयसोलेशन बेडस 614, आयसीयू बेड 400, व्हेंटिलेटर बेड्स 200ने कमी पडण्याची शक्यता आहे. तरी यासाठी राज्यसरकारने बेड्सची उपलब्धता करून द्यावी. - खाजगी लॅब व खाजगी हॉस्पिटल यांचा आणि महापालिकेचा समन्वय अधिक चांगला होणे गरजेचे आहे. यासाठी राज्य सरकारने भूमिका घ्यावी. कोरोना हरणार देश जिंकणार! अशीच आहे पुण्याच्या या मुलीची कोव्हिड विरोधातली लढाई - महापालिकेच्या शहरी गरीब योजनेअंतर्गत 80 हॉस्पिटलना कोरोनाच्या उपचार करण्यासाठी निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे दर महिन्याला 25 कोटींचा अतिरिक्त बोजा महापालिकेवर येणार आहे. पूर्वीचा 175 कोटी आणि आत्ताचा 25 कोटी असा आर्थिक बोजा महापालिकेवर बसणार आहे, तरी राज्यसरकारने याबाबतीत विचार करण्याची गरज आहे. - खाजगी लॅबच्या माध्यमातून स्वॅब तपासणीसाठी प्रतिरूग्ण 1800 रुपये महापालिका निधीतून उपलब्ध करून देणार आहे. टेस्टिंग क्षमता वाढविणे, महापालिकेच्या यंत्रणांमध्ये डॉक्टर, नर्सेस व पॅरामेडिकल स्टाफची आवश्यकता आहे, तरी ती तात्काळ पूर्ण करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. राष्ट्रवादीने ज्येष्ठ नगरसेवक गमावला, ‘दत्ताकाका’ यांचं कोरोनामुळे निधन - आर्थिक परिस्थिती चांगला असलेला रुग्ण खाजगी हॉस्पिटलमध्ये टेस्टसाठी गेल्यानंतर रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर तीव्र, मध्यम लक्षणे आहेत. ते न पाहता सर्व कुटुंबासाठी 4-5 बेडस पादाक्रांत करतात. त्यामुळे गंभीर रुग्णाला बेड मिळत नाहीत. यासंदर्भात खाजगी हॉस्पिटलला सूचना दिल्या पाहिजेत अशी भूमिका मांडली. पुण्यात राष्ट्रवादीमध्ये मोठी हालचाल, प्रिया बेर्डे 7 जुलैला येणार राजकारणात - आर्थिक क्षमता चांगली असणार्या नागरिकांनी, त्याचे रीपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर महापालिकेच्या क्वारनंटाईन सेंटर, आयसोलेशन सेंटरमध्ये भरती व्हावं. जेणेकरून खाजगी हॉस्पिटलमध्ये गंभीर रुग्ण आणि कोव्हिड रुग्णांची खाजगी हॉस्पिटल जागा उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोनातून खाजगी हॉस्पिटलनी विचार करावा यासंबंधी सूचना मांडल्या. संपादन - रेणुका धायबर