Home /News /pune /

कोरोना हरणार देश जिंकणार! अशीच आहे पुण्याच्या या मुलीची कोव्हिड-19 विरोधातील लढाई

कोरोना हरणार देश जिंकणार! अशीच आहे पुण्याच्या या मुलीची कोव्हिड-19 विरोधातील लढाई

सगळ्या बाजूने नकारात्मक बातम्या येत असताना पुण्यात एक अतिशय सकारात्मक आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.

पुणे, 04 जून : राज्यात कोरोनाचा प्रकोप होताना दिसत आहे. रोज कोरोना बाधितांचा आणि मृतांचा आकडा वाढत आहे. अशात आता पावसाळा आल्यामुळे कोरोनाचा धोका आणखी वाढणार असं बोललं जात आहे. सगळ्या बाजूने नकारात्मक बातम्या येत असताना पुण्यात एक अतिशय सकारात्मक आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. पुण्यातील ताडीवाला रस्ता भागात राहणाऱ्या दीक्षा राजगुरू या मतिमंद मुलीनं कोरोनावर मात केली आहे. यामध्ये तिच्या मानसिक धैर्याचं आणि डॉक्टरांचं विशेष कौतूक आहे. दीक्षा जन्मापासून मतिमंद आहे. तिला मूत्रपिंडाचा विकारही आहे. तिची दोन्ही मूत्रपिंडं काम करत नसल्यानं तिला डायलिसिसचे उपचार सुरू होते. अशातच तिला कोरोनाची लागण झाली. त्यामुळे सगळ्या कुटुंबावर मोठा ताण होता. आजूबाजूच्या नकारात्मक बाबींमुळे मन सुन्न झालं होतं. पण दीक्षाने मात्र माघार घेतली नाही. तिची जिद्द आणि मनाची सकारात्मकतेने तिला या महामारीतून सुखरूप बाहेर काढलं. राष्ट्रवादीने ज्येष्ठ नगरसेवक गमावला, 'दत्ताकाका' यांचं कोरोनामुळे निधन दीक्षाच्या पालकांनीही अजिबात हिम्मत हारली नाही. रुबी हॉल क्लीनिकमध्ये तिला उपचारासाठी दाखल केलं. एकीकडे को मॉरबीटी रुग्ण म्हणजे ज्यांना किडनी, मधुमेह, न्यूमोनिया असे विकार आहेत ते रुग्ण कोरोना झाला तर दगावत आहेत. पण दिक्षाने मात्र ही लढाई जिंकली आहे. पुण्यात राष्ट्रवादीमध्ये मोठी हालचाल, प्रिया बेर्डे 7 जुलैला येणार राजकारणात तिने या सगळ्या कठीण काळात आपल्या आरोग्याची काळजी घेतली. डॉक्टरांनी दिलेल्या सर्व सल्ल्यांचं तिने पालन केलं. त्यामुळे तीचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यामुळे रुग्णालयातून घरी आल्यावर केक कापून तिचं स्वागत करण्यात आलं. घाबरू नका वेळेवर उपचार घ्या असं सांगत तिच्या कुटुंबियांनी उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे आभार मानले आहेत. संपादन - रेणुका धायबर
First published:

Tags: Coronavirus, Coronavirus disease, Coronavirus in india, Coronavirus symptoms, Coronavirus update, Pune, Pune news

पुढील बातम्या