पुण्यात राष्ट्रवादीमध्ये मोठी हालचाल, प्रिया बेर्डे 7 जुलैला करणार राजकारणात प्रवेश

खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत पुण्यात मार्केट यार्डातील 'निसर्ग' इथल्या पक्षाच्या कार्यालयात हा प्रवेश होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत पुण्यात मार्केट यार्डातील 'निसर्ग' इथल्या पक्षाच्या कार्यालयात हा प्रवेश होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

  • Share this:
पुणे, 04 जुलै : सध्या राज्यात कोरोनाचा कहर वाढत आहे. पण अशात आता राजकारणातील घडामोडींना वेग आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे चित्रपट निर्मात्या, अभिनेत्री आणि दिग्दर्शक प्रिया लक्ष्मीकांत बेर्डे या 7 जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत पुण्यात मार्केट यार्डातील 'निसर्ग' इथल्या पक्षाच्या कार्यालयात हा प्रवेश होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. खरंतर फक्त प्रिया बेर्डेच नाही तर यावेळी अभिनेते सिध्देश्वर झाडबुके, लावणीसमाज्ञी शकुंतलाताई नगरकर, अभिनेत्री सुहासिनी देशपांडे, अभिनेते विनोद खेडेकर, लेखक दिग्दर्शक डॉक्टर सुधीर निकम, निर्माते संतोष साखरे हेदेखील राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. पवारांच्या नाराजीनंतर ठाकरे सरकारचं एक पाऊल मागे, मुंबईत 2 किमी प्रवास अट रद्द सिनेसृष्टीमध्ये पडद्याच्या मागे काम करणाऱ्या आणि सिनेसृष्टीचा खरा आधार असणाऱ्या लोकांना मला मदत करायची आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा चित्रपट व सांस्कृतिक विभाग उपयुक्त ठरू शकतो. यातून मी कलाकारांच्या अडचणी समजू शकते, त्यांना योग्य मदत करू शकते. त्यामुळे मी माझ्या कार्यकिर्दीचा हा नवीन टप्पा सुरू करत आहे अशी प्रतिक्रिया प्रिया बेर्डे यांनी एका वृत्तपत्राला दिली. त्या पुढे म्हणाल्या की, पुणे हे माझ्यासाठी महत्त्वाचं शहर आहे. लक्ष्मीकांत बेर्डे फाऊंडेशनचं काम पुण्यात सुरू आहे. माझं हॉटेलही पुण्यात असून माझ्या मुलांचं शिक्षणही पुण्यातच झालं आहे. त्यामुळे इथूनच मी माझ्या नव्या कामाला सुरुवात करणार आहे. यासाठी राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांची मला मदत असणार आहे असं प्रिया बेर्डे यांनी सांगितलं. संपादन - रेणुका धायबर
First published: