JOIN US
मराठी बातम्या / पुणे / पुण्यातील चिनी कंपनीत घुसला कोरोना, 7 कर्मचारी पॉझिटिव्ह; 130 क्वारंटाइन

पुण्यातील चिनी कंपनीत घुसला कोरोना, 7 कर्मचारी पॉझिटिव्ह; 130 क्वारंटाइन

पुण्यात कोरोनाच्या सर्वाधित रुग्णांची वाढ झाली आहे. यातच चाकन येथील एका कंपनीतील 7 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 19 जून : राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असताना पुण्यात कोरोनाच्या सर्वाधित रुग्णांची वाढ झाली आहे. यातच चाकन येथील एका कंपनीतील 7 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यात एका चिनी अधिकाऱ्याचाही समावेश आहे. चाकनमधील चिनी कंपनीतील काही कर्मचाऱ्यांमध्ये कोरोनाची लक्षणं दिसल्यानंतर, त्यांची चाचणी करण्यात आली. गुरुवारी यातील 7 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. दरम्यान, आता 130 कर्मचाऱ्यांना यात 9 चिनी अधिकाऱ्यांचाही समावेश आहे, या सगळ्यांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे, अशी माहिती खेड तालुक्याच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली. हे सर्व कर्मचारी पुण्यातील एका चिनी कंपनीत काम करत होते. चाकनमध्ये ही कंपनी असून कोरोनाची लागण झालेल्या कर्मचाऱ्यांवर सध्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वाचा- पुण्यात कोरोनाचा रेकॉर्ड ब्रेक, दिवसभरात वाढले सर्वाधिक रुग्ण मुख्य म्हणजे चिनी अधिकारी 25 मार्चआधीच चाकनमध्ये पाहणी करण्यास आले होते. मात्र त्यानंतर लॉकडाऊन आणि विमान प्रवास बंद केल्यानंतर ते इथेच अडकले. गेल्या आठवड्यात एक अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यानंतर कारखान्यातील सर्व कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यानंतर 6 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. त्यामुळं संपूर्ण कंपनी सील करण्यात आली असून, 130 कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. वाचा- पुण्यात भाजप युवा मोर्चाचे आंदोलन, चिनी वस्तूंची केली तोडफोड पुण्यात रुग्णांची संख्या वाढली पुण्यात गुरुवारी सर्वाधिक 472 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे तर दिवसभरात 193 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. गेल्या 24 तासांत पुण्यात सहा करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसारा, 245 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू असून त्यात 49 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 11115 वर पोहोचली असून 3722 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत एकूण मृत्यू 476 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे तर आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची संख्या 6906 इतकी आहे. वाचा- पुण्यात कोरोनाचा कहर! नवे हॉटस्पॉट आले समोर, आठवडाभरात आढळले 360 च्यावर रुग्ण संपादन-प्रियांका गावडे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या