पुण्यात कोरोनाचा रेकॉर्ड ब्रेक, दिवसभरात वाढले सर्वाधिक रुग्ण

पुण्यात कोरोनाचा रेकॉर्ड ब्रेक, दिवसभरात वाढले सर्वाधिक रुग्ण

पुण्यात दिवसभरात सर्वाधिक 472 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे तर दिवसभरात 193 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

  • Share this:

पुणे, 18 जून : राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असताना पुण्यात कोरोनाच्या सर्वाधित रुग्णांची वाढ झाली आहे. पुण्यात दिवसभरात सर्वाधिक 472 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे तर दिवसभरात 193 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. गेल्या 24 तासांत पुण्यात सहा करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसारा, 245 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू असून त्यात 49 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 11115 वर पोहोचली असून 3722 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत एकूण मृत्यू 476 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे तर आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची संख्या 6906 इतकी आहे.

दरम्यान, राज्यात रुग्णवाढीचा दर मंदावल्याचा दावा सरकारने केला असला, तरी दररोज निदान होणाऱ्या रुग्णांच्या एक दिवसाच्या संख्येत कपात झालेली दिसत नाही. आज दिवसभरात 3752 रुग्ण वाढले. महाराष्ट्राचा कोविड मृत्यूदरही देशाच्या तुलनेत जास्तच आहे. देशाचा सरासरी कोविड मृत्यूदर 3.36 आहे. तोही गेल्याच आठवड्यात 2.8 वरून वाढून एवढा झाला आहे. महाराष्ट्राचा मृत्यूदर 4.77 झाला आहे.

आज दिवसभरात 1672 रुग्ण बरे होऊन घरी गेले. बरं होणाऱ्या रुग्णांची संख्या अॅक्टिव्ह रुग्णसंख्येपेक्षा वाढली आहे. त्यामुळे दिलासा मिळाला असला, तरी नव्या रुग्णांच्यात वाढ कायम आहे. सरकारच्या आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार रुग्णवाढीचा दर कमी झाल्याची नोंद दिसते. 16 जूनच्या आठवड्यात रुग्णवाढीचा साप्ताहिक दर 3 टक्क्यांवर आला आहे. तो 31 मे च्या आठवड्यात 4 टक्के होता. कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये वाढ होत असली, तरी बरे झालेल्या रुग्णांची संख्याही वाढत असल्याने ही आकडेवारी समोर दिसत आहे.

संपादन - रेणुका धायबर

First published: June 18, 2020, 11:42 PM IST
Tags:

ताज्या बातम्या