Home /News /pune /

पुण्यात भाजप युवा मोर्चाचे आंदोलन, चिनी वस्तूंची केली तोडफोड

पुण्यात भाजप युवा मोर्चाचे आंदोलन, चिनी वस्तूंची केली तोडफोड

कोथरूड परिसरातील महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या पुतळ्यासमोर हे आंदोलन करण्यात आले. यावेळी चिनी वस्तूंची तोडफोड करीत होळीही करण्यात आली.

पुणे, 18 जून : भारतीय सीमेवर चीनने केलेल्या भ्याड हल्ल्यात भारताचे 20 जवान शहीद झाले आहेत. चीनने केलेल्या या भ्याड हल्ल्याच्या पुण्यात भारतीय युवा मोर्चाच्या वतीने निषेध करत आंदोलन करण्यात आले. कोथरूड परिसरातील महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या पुतळ्यासमोर हे आंदोलन करण्यात आले. यावेळी चिनी वस्तूंची तोडफोड करीत होळीही करण्यात आली. यावेळी बोलताना भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष दुष्यंत मोहोळ म्हणाले, चीनने भ्याडपणे केलेल्या हल्ल्यात भारताच्या 20 जवानांना वीरमरण आले. चीनच्या या कृत्याचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. चीनला भारतीय सैन्याने प्रत्युत्तर दिले आहेच. पण एक भारतीय नागरिक म्हणून भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी आणि कोथरूड परिसरातील नागरिकांनी आजपासून चिनी वस्तू न वापरण्याची प्रतिज्ञा घेतली आहे. हेही वाचा - '...तर शरद पवारांच्याच पक्षात गेलो असतो', आमदारकीबाबत आता राजू शेट्टींनी घेतली वेगळी भूमिका कोथरूड विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष पुनीत जोशी म्हणाले, भारताच्या वीर जवानांनी चीनच्या सैनिकांना मारता मारता वीरगती पत्करली. या वीर सैनिकांनी 40 हुन अधिक चिनी सैनिकांना मारले. भारतीय सैनिकांचे हे बलिदान व्यर्थ जाणार नाही. कोथरूड मतदार संघातील भाजपचे कार्यकर्ते यापुढे चिनी वस्तू, चिनी ऍप वापरणार नाही अशी सर्वांनी प्रतिज्ञा केली आहे. संपादन - अक्षय शितोळे
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Pune news

पुढील बातम्या