बारामती, 6 नोव्हेंबर : राज्याच्या राजकारणात व्यस्त असलेले पवार कुटुंबिय (PAwar Family) सणासुदीच्या दिवशी नेहमीच एकत्र येतात. आज देखील दिवाळीच्या, भाऊबीजेच्या निमित्ताने शरद पवार (Sharad Pawar) यांचं संपूर्ण कुटुंब एकत्र दिसलं. आज भाऊबीजेच्या निमित्तानं बारामतीतल्या अजित पवारांच्या घरी मोठ्या उत्साहात भाऊबीज साजरी झाली. शरद पवार यांचे बहिणींनी औक्षण केले. तर खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांचे औक्षण केले.
आजच्या भाऊबीजेच्या निमित्तीने पवार कुटुंबियांच्या तीन पिढ्या एकत्र दिसल्या शरद पवार आणि त्यांचे बंधू प्रतापराव पवार यांचं त्यांची बहिण मिनाताई जगधने यांनी औक्षण केले. त्यानंतर अजित पवार यांची ओवाळणी झाली. आमदार रोहित पवारांचे वडील आणि अजित पवारांचे बंधू राजेंद्र पवार यांचीही भाऊबीज पार पडली. आमदार रोहित पवार आणि अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांची भाउबीजही बारामतीत साजरी झाली. Anil Deshmukh: अनिल देशमुखांचा कोठडीतील मुक्काम वाढला, 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
दरवर्षी प्रमाणे पवार कुटुंबीयांनी यंदा देखील दिवाळी सणानिमित्त एकत्र येत दिवाळी साजरी करत आहेत. भाऊबीजेच्या सणानिमित्त आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या काटेवाडीतील निवासस्थानी भाऊबीजेचा कार्यक्रम पार पडला. खासदार सुप्रिया सुळे यांनी आपले भाऊ अजित पवार आणि राजेंद्र पवार यांचे औक्षण केले. कालचा पाडवा देखील पवार कुटुंबीयांनी अत्यंत उत्साहात साजरा केला होता. नव्या नवरीप्रमाणे नटली Rinku Rajguru! अभिनेत्रीच्या ब्रायडल लुकवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा
दिवाळी पाडव्याचे काही फोटो, व्हिडिओ खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केली होती. मागच्या वर्षी कोरोनामुळे उत्साह कमी होता. कार्यकर्त्यांचा भेट सोहळा देखील मागच्या वर्षी नव्हता. यंदा पवार कुटुंबात दिवाळीचा सण एकत्रित येत मोठ्या उत्साहात आनंदात साजरा झाला.