सुसंस्कृत, पुरोगामी पुण्यात जादूटोण्याचा धक्कादायक प्रकार समाेर आला आहे. पैशाचा पाऊस पडतो म्हणून एका भोंदूबाबाने युवकाचे 18 लाख रुपये पळवले आहेत. हडपसर परिसरात असलेल्या ससाणे नगर परिसरात पैशाचा पाऊस पडण्याच्या धक्कादायक प्रकाराची नाेंद पाेलीसांत झाली आहे. पाेलीस घटनेची सखाेल चाैकशी करीत आहेत.