JOIN US
मराठी बातम्या / पुणे / शरद पवारांना 'महाराष्ट्र केसरी'चं निमंत्रण का नाही? सुप्रिया सुळे म्हणतात..

शरद पवारांना 'महाराष्ट्र केसरी'चं निमंत्रण का नाही? सुप्रिया सुळे म्हणतात..

‘महाराष्ट्र केसरी’चं निमंत्रण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना देण्यात आलं नव्हतं. यावरून सुप्रिया सुळे यांनी शिंदे, फडणवीस सरकारला जोरदार टोला लगावला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 15 जानेवारी : शनिवारी पुण्यात महाराष्ट्र केसरीची अंतिम फेरी पार पडली. या अंतिम फेरीसाठी भाजपच्या प्रमुख नेत्यांना निमंत्रण देण्यात आलं होतं. या स्पर्धेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन यांनी उपस्थिती लावली. मात्र या स्पर्धेचं निमंत्रण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना देण्यात आलं नव्हत. यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी सत्ताधाऱ्यांना टोला लगावला आहे. खेळ हा देशासाठी असतो, कोणत्या एखाद्या पक्षासाठी नसतो. खेळात कधी पक्ष आणू नये. या स्पर्धेसाठी सर्वच राजकीय पक्षांना किंवा कुस्तीप्रेमींना बोलावलं असतं तर चांगलं झालं असतं असं सुळे यांनी म्हटलं आहे. भाजपला टोला  दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी भाजपला जोरदार टोला लगावला आहे. त्यांनी नाशिक पदवीधरसंघाच्या निवडणुकीवरून भाजपवर निशाणा साधला आहे. ईडी सरकारमध्ये बऱ्याच गोष्टी पहिल्यांदा घडताना दिसत आहेत. तोडणे हे भाजपचं मॉडेल आहे. तीथे फक्त दडपशाही आणि प्रलोभनाचाच उपयोग होतो. अजितदादा याबद्दल बोलले आहेत ,त्यामुळे त्यावर अधिक बोलण्याची गरज नसल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना सल्ला   केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकीचा फोन आल्यानं सर्वत्र खळबळ उडाली होती. त्यानंतर हा फोन कर्नाटकच्या जेलमधून आल्याचं समोर आलं. यावरून सुप्रिया सुळे यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे. स्वतःच्या घरात काय चाललं आहे हे तिथल्या नेत्यांनी पहावं. गडकरी यांना एक कौदी धमकीचा फोन करतो. गडकरी हे देशातील मोठे नेते आहेत, आणि त्यांना जर अशाप्रकारची धमकी येत असेल तर हे तेथील सरकारचे फेल्युअर असल्याची टीका सुळे यांनी केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या