JOIN US
मराठी बातम्या / पुणे / Weather Update: मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात धो-धो; काही तासांत या जिल्ह्यांत धडकणार पाऊस

Weather Update: मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात धो-धो; काही तासांत या जिल्ह्यांत धडकणार पाऊस

Rain in Maharashtra: ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला काही दिवस ब्रेक (Monsoon comeback in maharashtra) घेतल्यानंतर राज्यात मान्सूननं पुनरागमन केलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 17 ऑगस्ट: महिन्याच्या सुरुवातीला काही दिवस ब्रेक (Monsoon comeback in maharashtra) घेतल्यानंतर राज्यात मान्सूननं पुनरागमन केलं आहे. सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात सर्वदूर पावसाची स्थिती (Rain In Maharashtra) निर्माण झाली आहे. आज राज्यात पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा , मध्य आणि उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याकडून (IMD) वर्तवण्यात आली आहे. विदर्भ आणि दक्षिण महाराष्ट्रातील काही जिल्हे वगळता आज राज्यात सर्वत्र जोरदार पावसाची शक्यता आहे. आज हवामान खात्यानं औरंगाबाद, जालना परभणी आणि यवतमाळ या चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी केला आहे. या चार जिल्ह्यात पुढील काही तासांत जोरदार पावसाची शक्यता आहे. दरम्यान याठिकाणी वेगवान वारा वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना हवामान खात्यानं सतर्कतेचा इशारा दिला आहे. याव्यतिरिक्त पुण्यासह घाट परिसर, मध्य महाराष्ट्र कोकणातील काही जिल्हे आणि उत्तर महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत पावसाच्या सरी कोसळणार आहेत.

हेही वाचा- कोरोनाला घाबरून जोडप्यानं संपवलं जीवन; मृत्यूआधी पोलिसांना पाठवला भावनिक मेसेज उद्याही महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम राहणार आहे. उद्या राज्यात पाच जिल्ह्यांना ऑरेंज तर अकरा जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. बुधवारी उत्तर महाराष्ट्रातील नंदूरबार, नाशिक, धुळे, जळगाव आणि औरंगाबाद या पाच जिल्ह्यांत मुसळधार पाऊस कोसळणार आहे. तर अकोला, बुलडाणा, वाशीम, जालना, बीड, अहमदनगर, पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यांत मध्यम ते मुसळधार पावसाच्या सरी कोसळणार आहे.

हेही वाचा- राज्यात Delta Plus चा धोका वाढत असताना आरोग्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती पुढील दोन तासांत जिल्ह्यांत धडकणार पाऊस पुढील दोन ते तीन तासांत धुळे, जळगाव, नाशिक, पुणे, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, हिंगोली आणि परभणी या जिल्ह्यांत पाऊस धडकणार आहे. दरम्यान विजांच्या कडकडाटासह वेगवान वारे वाहण्याची शक्यता आहे. ताशी 30-40 किमी प्रतितास वेगानं वारे वाहणार आहेत. तसेच आकाशात विजांचं प्रमाण अधिक असल्यानं नागरिकांनी मोठ्या झाडाखाली उभं राहू नये असा सल्ला हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या