• Home
 • »
 • News
 • »
 • coronavirus-latest-news
 • »
 • कोरोनाला घाबरून जोडप्यानं संपवलं जीवन; मृत्यूआधी पोलिसांना पाठवला भावनिक मेसेज

कोरोनाला घाबरून जोडप्यानं संपवलं जीवन; मृत्यूआधी पोलिसांना पाठवला भावनिक मेसेज

दोघांमध्येही गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची लक्षणं (Corona Symptoms) दिसत होती. मंगळुरु पोलिसांनी अशी माहिती दिली, की आत्महत्या करण्याआधी या जोडप्यानं पोलीस कमिशनरला व्हॉईस मेसेज पाठवला होता.

 • Share this:
  बंगळुरू 17 ऑगस्ट : देशाच्या काही भागांमध्ये कोरोनाची दुसरी लाट (2nd Wave of Coronavirus) अजूनही आटोक्यात आलेली नाही. अशा परिस्थिती काही लोक चिंतेत आहेत. याचदरम्यान आता एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यात एका 40 वर्षाच्या व्यक्तीनं आणि त्याच्या पत्नीनं कोरोनाची लक्षणं दिसताच भीतीनं आत्महत्या (Couple Committed Suicide Due to Corona Anxiety) केली आहे. ही घटना कर्नाटकातील (Karnataka) आहे. मंगळुरु पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्या करण्याआधी या दाम्प्त्यानं पोलिसांना एक व्हॉईस मेसेजही (Voice Message) पाठवला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या जोडप्याची ओळख रमेश आणि गुना आर सुवर्णा अशी पटली आहे. ते मंगळुरुमधील अपार्टमेंटमध्ये राहत होते. समोर आलेल्या माहितीनुसार, दोघांमध्येही गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची लक्षणं दिसत होती. मंगळुरु पोलिसांनी अशी माहिती दिली, की आत्महत्या करण्याआधी या जोडप्यानं पोलीस कमिशनरला व्हॉईस मेसेज पाठवला होता. बोअरवेलचं बटण दाबलं अन् होत्याचं नव्हतं झालं; विजेच्या धक्क्याने मुलीचा मृत्यू या मेसेजमध्ये दाम्प्त्यानं म्हटलं होतं, की मीडियामध्ये कोरोना व्हायरसंदर्भात येणाऱ्या बातम्यांमुळे ते घाबरले आहेत आणि याच कारणामुळे ते आपलं जीवन संपवत आहेत. यानंतर पोलीस कमिशनरनं या जोडप्याला कोणतंही चुकीचं पाऊल न उचलण्याचा सल्ला दिला होता. सोबत मीडिया आणि पोलिसांनी या जोडप्याकडे जाण्याचा आणि त्यांची भेट घेण्याचा सल्लाही दिला होता. Mumbai: EPFO कर्मचाऱ्याने केला 21 कोटींचा घोटाळा,PF कार्यालयातील धक्कादायक स्कॅम पोलीस जोपर्यंत या जोडप्याच्या अपार्टमेंटमध्ये पोहोचले तोपर्यंत त्यांनी आत्महत्या केलेली होती. अपार्टमेंटमध्ये महिलेनं लिहिलेली एक सुसाईड नोटही मिळाली. यात तिनं आपल्या तेरा दिवसांच्या बाळाच्या मृत्यूबद्दलही लिहिलं होतं आणि यामुळेही ती दुःखी असल्याचं तिनं सांगितलं होतं. यात हेदेखील लिहिलं होतं, की महिलेला मधुमेहाचाही भरपूर त्रास आहे. तिला दिवसाला इन्सुलिनचे दोन इंजेक्शन घ्यावे लागत होते.
  Published by:Kiran Pharate
  First published: