JOIN US
मराठी बातम्या / पुणे / अजित पवारांचा धडाका सुरूच, पहिल्याच बैठकीत बदललं 'पुणे मेट्रो'चं नाव

अजित पवारांचा धडाका सुरूच, पहिल्याच बैठकीत बदललं 'पुणे मेट्रो'चं नाव

अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री या नात्याने काही महत्त्वाच्या गोष्टींचा निर्णय घेत आपणच या सरकारमध्ये ‘दादा’ आहोत हे दाखवून दिलंय.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे18 जानेवारी : पदभार स्वीकारल्यापासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठका आणि निर्णयांचा धडाकाच लावलाय. पुण्यात आज त्यांनी विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. या बैठकीत मेट्रोसंदर्भातले अनेक महत्त्वाचे निर्णय अजित पवारांनी घेतले. मेट्रोचे प्रस्तावित 6 कॉरिडॉर टप्प्याटप्प्याने सुरू करण्याऐवजी सगळ्या कॉरिडॉरचं काम एकाचवेळी सुरू करण्यासाठी डीपीआर करण्याचे आदेश त्यांनी दिलेत. त्याचबरोबर पुणे मेट्रोचं नाव बदलून ‘पुणे-पिंपरी चिंचवड महामेट्रो’ असं करण्याच्या सूचनाही प्रशासनाला दिल्यात.  पिंपरी स्वारगेट मेट्रो मार्ग वाढवून निगडी कात्रज असा करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आलाय. वनाज रामवाडी मार्ग वाढवून तो चांदणी चौक ते वाघोली असा होणार आहे. शिवाजीनगर हिंजवडी हा पीएमआरडीए करत असलेला मेट्रो चा मार्ग शिवाजीनगर माण असा वाढवण्यात येणार आहे. हडपसर स्वारगेट हा मार्ग नव्याने प्रस्तावित आहे. तर निगडी चाकण मेट्रो मार्गाची चाचपणी करण्याचे आदेश देण्यात आलेत. खडकवासला ते स्वारगेट हा ही मेट्रो मार्ग प्रस्तावित आहे. वारजे ते शिवाजीनगर ह्या मार्गाचा विचार करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्यात. अवधूत गुप्तेंच्या ‘पटानी’ गुगलीवर आदित्य ठाकरे ‘क्लिन बोल्ड’ अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री या नात्याने काही महत्त्वाच्या गोष्टींचा निर्णय घेत आपणच या सरकारमध्ये ‘दादा’ आहोत हे दाखवून दिलंय. वाडीया रुग्णालयाचा प्रश्न मार्गी लावणे, ईस्टर्न फ्री वेला माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचं नाव देणं आणि राज्यातील गुन्हेगारी संपवण्यासाठी कठोर कारवाई करण्याचे आदेश देत अजित पवार यांनी प्रशासनावर असलेला आपला वचक दाखवून दिलाय.

आदित्य ठाकरेंचा कॉन्फरन्स कॉल, शरद पवार, सोनिया गांधी आणि मुख्यमंत्र्यांशी संवाद

खरंतर आज वाडीया रुग्णालयाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठक बोलवली होती. पण त्या आधीच अजित पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मीला ठाकरे यांच्यासोबत बैठक घेत रुग्णालयासाठी ४६ कोटी रुपये देण्यात येणार आहेत असं सांगत प्रश्न मार्गी लावला आणि एक प्रकारे उद्धव ठाकरे यांच्यावर मात केली. तसंच अनेकदा सार्वजनिक ठिकाणांना होणारा वाद पाहता पवार यांनी ईस्टर्न फ्री वेला माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचं नाव देत यातही बाजी मारली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या