मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

अवधूत गुप्तेंच्या ‘पटानी’ गुगलीवर आदित्य ठाकरे 'क्लिन बोल्ड'

अवधूत गुप्तेंच्या ‘पटानी’ गुगलीवर आदित्य ठाकरे 'क्लिन बोल्ड'

त्यावर आदित्य म्हणाले, आता सगळी जबाबदारी आईने मुख्यमंत्री साहेबांवर टाकली आहे. त्यावर सगळीच जबाबदारी म्हणजे? असा प्रश्न अवधूतने विचारला.

त्यावर आदित्य म्हणाले, आता सगळी जबाबदारी आईने मुख्यमंत्री साहेबांवर टाकली आहे. त्यावर सगळीच जबाबदारी म्हणजे? असा प्रश्न अवधूतने विचारला.

त्यावर आदित्य म्हणाले, आता सगळी जबाबदारी आईने मुख्यमंत्री साहेबांवर टाकली आहे. त्यावर सगळीच जबाबदारी म्हणजे? असा प्रश्न अवधूतने विचारला.

  • Published by:  Ajay Kautikwar
हरिष दिमोटे, संगमनेर 17 जानेवारी : 'ठाकरे' आडनावाच्या वलयामुळे कुठल्याही कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यावर आदित्य ठाकरे हे कायम लक्षवेधी ठरतात. संगमनेर इथं आयोजित केलेल्या युवा महोत्सवात आदित्य ठाकरेंना त्यांच्या लग्नाविषयी विचारण्यात आलं त्यावेळी अवधूत गुप्ते आणि आदित्य यांच्यामध्ये मिश्किल जुगलबंदी रंगली. आदित्य आणि अभिनेत्री दिशा पटनी यांच्या मैत्रीबद्दल कायम चर्चा होत असते. अनेकदा त्या दोघांचे फोटेही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे या कार्यक्रमातल्या मनमोकळ्या चर्चेत लग्नाचा विषय आला नसता तरच नवल. त्यावर त्या दोघांची चांगलीच जुगबंदी रंगली. मात्र एका प्रश्नावर आदित्य क्लिन बोल्ड झाल्याचं बघायला मिळालं. या संवादाला तरुणाईचीही चांगलीच दाद मिळाली. अवधूत गुप्ते म्हणाले की, आईने किती दिवस आता जबाबदारी घ्यायची? त्यावर आदित्य म्हणाले, आता सगळी जबाबदारी आईने मुख्यमंत्री साहेबांवर टाकली आहे. त्यावर सगळीच जबाबदारी म्हणजे? असा प्रश्न अवधूतने विचारला. त्यानंतर त्याने सोशल मीडियावरच्या चर्चेचा उल्लेख करत हिंदीत कमेंट केली. आपका उत्तर हमको 'पटनी' चाहिये? असं म्हणत त्याने दिशा पटनी आणि आदित्यबद्दलच्या चर्चेचा उल्लेख केला, त्यावर आदित्यनेही अवधूतला तुझ्या प्रश्नांची 'दिशा' चुकली असा टोला लगावला. सगळी जबाबदारी दिली मात्र त्याबद्दल अजुन काही ठरलं नाही असंही सांगून टाकलं. यावर प्रेक्षकांमधून तरुणांनी दिशा...दिशा...अश्या घोषणा दिल्याने आदित्यही काहीसा लाजून गेला. रोहित पवार जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट फोन लावतात... आदित्य ठाकरेंनी कुणाला केला फोन? सगळ्याच तरुण आमदारांनी दिलखुलास उत्तरं दिली. यात लक्षवेधी ठरला तो  शेवटच्या भागात जादूच्या फोनवरून आपली इच्छा होईल त्या व्यक्तीशी बोलण्या अभिनय करण्याचा राऊंड. अवधूत गुप्ते यांनी प्रत्येकाच्या हातात फोन देऊन त्यांना बोलायला सांगितलं. यावेळी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कॉन्फरन्स कॉल करून त्यांच्याशो बोलण्याचा फोनवरून बोलण्याचा उत्तम अभिनय केला. 'सत्तेसाठी सतराशे साठ, महाराष्ट्र धर्मासाठी एकच सम्राट', मनसेची पोस्टरबाजी ते म्हणाले, तुम्हा सगळ्यांशी बोलताना मला आनंद होतोय. महाराष्ट्रात महाघाडीचं सरकार आलं आहे. ते सरकार पाच वर्ष उत्तम पद्धतीने चालेल अशी काळजी घ्या. आदित्य ठाकरेंच्या या खास फोन कॉलवर सगळ्या तरुणाईने टाळ्यांच्या कडकडाटाने दाद दिली. यावेळी सगळ्यांनी आदित्य ठाकरेंना लग्नावरून टोमणेही मारले.
First published:

Tags: Aaditya thackeray, Disha patni

पुढील बातम्या