मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

आदित्य ठाकरेंचा कॉन्फरन्स कॉल, एकाचवेळी शरद पवार, सोनिया गांधी आणि मुख्यमंत्र्यांशी संवाद

आदित्य ठाकरेंचा कॉन्फरन्स कॉल, एकाचवेळी शरद पवार, सोनिया गांधी आणि मुख्यमंत्र्यांशी संवाद

यात लक्षवेधी ठरलं ते शेवटच्या भागात जादूच्या फोनवरून आपली इच्छा होईल त्या व्यक्तीशी बोलण्या अभिनय करण्याचा राऊंड. अवधूत गुप्ते यांनी प्रत्येकाच्या हातात फोन देऊन त्यांना बोलायला सांगितलं.

यात लक्षवेधी ठरलं ते शेवटच्या भागात जादूच्या फोनवरून आपली इच्छा होईल त्या व्यक्तीशी बोलण्या अभिनय करण्याचा राऊंड. अवधूत गुप्ते यांनी प्रत्येकाच्या हातात फोन देऊन त्यांना बोलायला सांगितलं.

यात लक्षवेधी ठरलं ते शेवटच्या भागात जादूच्या फोनवरून आपली इच्छा होईल त्या व्यक्तीशी बोलण्या अभिनय करण्याचा राऊंड. अवधूत गुप्ते यांनी प्रत्येकाच्या हातात फोन देऊन त्यांना बोलायला सांगितलं.

हरिष दिमोटे, संगमनेर 17 जानेवारी : संगमनेर इथं आज तरुणाईला विशेष मेजवानी मिळाली. अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने मेधा-2020 युवा संस्कृतीत महोत्सवात संवाद तरुणाईशी या कार्यक्रमाचं आयोजन संगमनेर इथं करण्यात आलं होतं. त्यात विविध पक्षांच्या तरुण आमदारांची मुलाखत अभिनेते अवधूत गुप्ते यांनी घेतली. या कार्यक्रमात आमदार आदित्य ठाकरे, रोहित पवार, धिरज देशमुख, आदिती तटकरे, आणि झिशान सिद्धीकी, ऋतुराज पाटील यांनी सहभाग घेतला. सगळ्याच तरुण आमदारांनी दिलखुलास उत्तरं दिली. यात लक्षवेधी ठरलं ते शेवटच्या भागात जादूच्या फोनवरून आपली इच्छा होईल त्या व्यक्तीशी बोलण्या अभिनय करण्याचा राऊंड. अवधूत गुप्ते यांनी प्रत्येकाच्या हातात फोन देऊन त्यांना बोलायला सांगितलं. यावेळी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कॉन्फरन्स कॉल करून त्यांच्याशो बोलण्याचा फोनवरून बोलण्याचा उत्तम अभिनय केला. ते म्हणाले, तुम्हा सगळ्यांशी बोलताना मला आनंद होतोय. महाराष्ट्रात महाघाडीचं सरकार आलं आहे. ते सरकार पाच वर्ष उत्तम पद्धतीने चालेल अशी काळजी घ्या. आदित्य ठाकरेंच्या या खास फोन कॉलवर सगळ्या तरुणाईने टाळ्यांच्या कडकडाटाने दाद दिली. यावेळी सगळ्यांनी आदित्य ठाकरेंना लग्नावरून टोमणेही मारले. तर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी फोनवर बोलण्याचा केलेला अभिनयही असाच लक्षवेधी ठरला. त्यांच्यातलं संभाषण असं झालं...रोहित पवार म्हणाले, मोदी साहेब मी राहित पवार बोलतोय. तुम्ही ओळखलंच असेल. केंद्रात तुमचं सरकार येवून आता वर्ष होईल. तरुणाईला जास्तीत नोकऱ्या कशा मिळतील याची काळी घ्या. महाराष्ट्रात महाविकास आघाडी आलीय त्यामुळे मागच्या पाच वर्षात विकास झाला नाही ते विकास आता होईल. 3 सेकंदात घराचा चुराडा! स्फोटकं लावून उद्ध्वस्त केली इमारत, पाहा थरारक VIDEO या तरुणांना नोकऱ्या मिळतील असं धोरण ठरवा. शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घ्या. केंद्रातच्या धोरणात थोडा बदल करा. आता फक्त चारच वर्ष राहिले आहेत. धन्यवाद. रोहित पवारांच्या या संभाषणाला सगळ्या तरुणाईने टाळ्यांच्या कडकडाटात साद दिली. या मुलाखतीतला हा राऊंड चांगलाच गाजला. यात धिरज देशमुख यांनी अमिताभ बच्चन यांना, झिशान यांनी सलमान खान, तर ऋतुराज यांनी आपल्या पत्नीला फोन करून संभाषण केलं. हा फोन करणं म्हणजे गुप्ते यांनी दिलेल्या बंद फोनवर आवडत्या व्यक्तिशी बोलण्याचा अभिनय करणं असा हा राऊंड होता. 'सत्तेसाठी सतराशे साठ, महाराष्ट्र धर्मासाठी एकच सम्राट', मनसेची पोस्टरबाजी आदित्य ठाकरे काय म्हणाले? मंत्रीपदाची शपथ हा माझ्यासाठी सर्वात मोठा क्षण होता. विधिमंडळात जाण्याची माझीच हौस होती. माझे आजोबा यांचे वेगळे व्यक्तीमत्व. जेव्हढं काम तुम्ही हाऊमधून करू शकता तेव्हढं बाहेरून नाही. आम्ही विचारांची नवी पेरणी केलीय. नवा विचार घेऊन महाराष्ट्राचा विकास करणार. नवा महाराष्ट्र आम्हाला घडवायचय. काँग्रेस आणी राष्ट्रवादीसोबत काम करणं सोपं आहे. महाराष्ट्रात बदल झाल्यानंतर झारखंडमधेही. नवा विचार महाराष्ट्राने दिला. देशाला पुढे कसं न्यायचं हा विचार काँग्रेस राष्ट्रवादीकडे. रोहित पवार काय म्हणाले? ज्या कुटूंबात आम्ही जन्मलो ते आमचे नशिब. लहानपणापासून समाजकारण बघीतलं. लहानपनापासून बघीतलेलं डोक्यात बसलं. मी समाजकारण करणाराच्या घरात जन्मलो म्हणून राजकारणात. रोहित पवार यांचे राजकारणातील घराणेशाही यावर उत्तर. आता आमची मनं एकत्र आलीय. महाविकास आघाडीची समिकरणं तळागाळा पर्यन्त पोहचणार. पवार साहेबांनी दाखवून दिलं की कधीही झुकायचं नाही. सर्वसामान्य लोकांसाठी प्रामाणिक पणाने कामं केलं तर कोणतीही ताकद तुम्हाला हरवू शकत नाही. हीच पवार साहेबांची आम्हाला शिकवण आहे.

आई म्हणाली होती राजकारणात जाऊ नकोस - आदित्य ठाकरे

धिरज देशमुख काय म्हणाले? महाविकास आघाडी आणखी मजबूत झाली पाहीजे. येत्या पंचवीस वर्षापर्यंत ही आघाडी दिसेल. ही दोस्ती आता तुटायची नाय. माझे बाबा माझ्यासाठी हिरो. बाबांनी केवळ आपला परीवार नाही तर महाराष्ट्राला सांभाळले. विलासरावांच्या स्वप्नातील मराठवाडा कसा असावा? तर मराठवाडा दुष्काळमुक्त झाला पाहीजे. शेतकरी सुखी झाला पाहीजे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून मराठवाड्याचा विकास होईल हा विश्वास आहे. माझे दोन्ही मोठे भाऊ माझ्यासाठी रोल मॉडेल. राजकारणात यायचं की नाही हे लोक ठरवतात. लातूरच्या लोकांनी ठरवलं म्हणून मी राजकारण. आदिती तटकरे आपली मुलगी डॉक्टर इंजिनिअर होवू शकतं नाही असं वडीलांनाही वाटलं. लहानपनापासून वडीलांचं राजकारण बघत आले. महिलांना समानतेची वागणूक राजकारणातही मिळतेय. आमच्याकडून जनतेच्या खूप अपेक्षा. झिशान सिद्धीकी वडीलांना लहानपणापासून लोकांसाठी काम करताना बघीतले. मलाही त्याच वाटेने जावं असं वाटलं. समाजातील प्रश्न सोडवण्यासाठी राजकारणात. हे सरकार सत्तेत आलं नसतं तर शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला नसता. भाजपाचं एव्हढं मोठं मन नाही.
First published:

Tags: Aaditya thackeray

पुढील बातम्या