JOIN US
मराठी बातम्या / पुणे / पुण्यात कोरोनाचा कहर! ॲक्टिव्ह रुग्णसंख्या पोहोचली 50 हजारांवर

पुण्यात कोरोनाचा कहर! ॲक्टिव्ह रुग्णसंख्या पोहोचली 50 हजारांवर

देशातील सर्वाधिक ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण (coronavirus in pune) हे पुण्यात आहेत.

जाहिरात

प्रायमरी कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वात जास्त होत आहे

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 25 मार्च : राज्यात (Coronavirus in maharashtra) पुण्यात कोरोनाने (Coronavirus in pune) अक्षरश: थैमान घातलं आहे. देशातील सर्वाधिक ॲक्टिव्ह रुग्णसंख्या असलेल्या दहा जिल्ह्यांमध्ये पुणे पहिला क्रमांकावर आहे. पुण्यातील अॅक्टिव्ह रुग्णसंख्येने आता 50 हजारांचा टप्पा गाठला आहे. आतापर्यंत एकूण 49,710 रुग्ण उपचार घेत आहेत. राज्याच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यात आज 35,952 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णांचा आकडा   26,00,833 वर पोहोचला आहे. त्यापैकी 2,62,685 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. उपचार घेत असलेले सर्वाधिक रुग्ण हे पुण्यात आहेत.  पुण्यात दिवसभरात 6,432 नव्या कोरोना रुग्णांसह एकूण रुग्णांचा आकडा 4,92,694 वर पोहोचला आहे.

संबंधित बातम्या

शिवाय राज्यात एका दिवसात शंभरपेक्षा अधिक बळी गेले आहेत. 24 तासांत 111 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान राज्यातील ही परिस्थिती आणखीनच गंभीर होणार आहे. पुढील दोन आठवड्यांत दिवसाला 1000 बळी जातील, असा इशारा राज्याच्या आरोग्य विभागाने दिल्याचं वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं होतं. हे वाचा -  होळी साजरी करताय? हे नियम नक्की पाहा अन्यथा होऊ शकते मोठी कारवाई! वाढती कोरोना प्रकरणं पाहता प्रशासनाने होळी आणि रंगपंचमी साजरी करण्यावर बंदी घातली आहे. तरीदेखील कुणी हे सण साजरे करताना दिसलं तर त्यांच्यावर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. शिवाय केंद्र सरकारने लॉकडाऊन बाबत नवीन निर्बंध जाहीर केले आहेत. 1 एप्रिल ते 31 एप्रिल पर्यंत हे नियम लागू करण्यात येणार आहेत. गृहमंत्रालयाने नवीन निवेदन जाहीर केलं आहे. हे वाचा -  कोरोनाची दुसरी लाट 100 दिवस टिकू शकेल; सर्वोच्च बिंदूबद्दलचा धक्कादायक अंदाज यात कोरोनाशी लढण्यासाठी उपाय करण्याचा हक्क स्थानिक प्रशासनाला देण्यात यावा असं म्हटलं आहे. म्हणजे आत्ता स्थानिक, जिल्हा किंवा तालुका पातळीवर लॉकडाऊन होऊ शकतं . आत्ता तर लॉकडाऊन झालं तर कोणत्याही प्रमाणात प्रवासाचे निर्बंध नसतील. या लॉकडाऊनमध्ये कोणत्याही प्रकारची जिल्हा बंदी नसणार आहे. राज्या-राज्यामधील प्रवासी वाहतूक सुरु राहील.आत्ता कोणत्याही व्यवहारांवर बंदी घालण्यात येणार नाही. मात्र आवश्यक ते निर्बंध असणार आहेत. SOP चं पालन करून व्यवहार चालू ठेवण्यात येतील.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या