Home /News /national /

देशात कोरोनाची दुसरी लाट 100 दिवस टिकू शकेल; सर्वोच्च बिंदूबद्दलचा धक्कादायक अंदाज

देशात कोरोनाची दुसरी लाट 100 दिवस टिकू शकेल; सर्वोच्च बिंदूबद्दलचा धक्कादायक अंदाज

राज्यात कोरोनाचा आलेख सध्या सध्या घसरणीला लागला आहे. मात्र पुढच्या काही महिन्यांमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

राज्यात कोरोनाचा आलेख सध्या सध्या घसरणीला लागला आहे. मात्र पुढच्या काही महिन्यांमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांची देशभरातली संख्या 25 लाखांपर्यंत जाईल, असा धक्कादायक अंदाज SBI च्या अभ्यास अहवालात आला आहे. ही लाट कधी सर्वोच्च बिंदूवर पोहोचेल तेही वर्तवण्यात आलं आहे. स्थानिक लॉकडाउन कोरोनाला आटोक्यात ठेवण्यात कुचकामी ठरतील, असंही यात म्हटलं आहे.

पुढे वाचा ...
नवी दिल्ली, 25 मार्च : भारतात फेब्रुवारीपासून रोजच्या कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असून, त्यातून कोरोनाची दुसरी लाट (Second wave of coronavirus)  आली असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत, असं स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI report) अहवालात म्हटलं आहे. 15 फेब्रुवारीपासून विचार केल्यास कोरोनाची ही दुसरी लाट 100 दिवसांपर्यंत टिकू शकते. तसंच 23 मार्चपर्यंतचे ट्रेंड्स लक्षात घेतले, तर दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांची देशभरातली संख्या 25 लाखांपर्यंत जाऊ शकेल, असं अहवालात म्हटल्याचं वृत्त एनडीटीव्हीने दिलं आहे. 'फेब्रुवारी 2021पासून सुरू झालेल्या भारतातल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रोजची रुग्णसंख्या वाढत आहे. या लाटेतली एकूण रुग्णसंख्या 25 लाखांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. सद्यस्थितीचा विचार करता दुसऱ्या लाटेचा सर्वोच्च बिंदू (Peak of coronavirus wave in India) आपल्या एप्रिल महिन्याच्या उत्तरार्धात पाहायला मिळेल,' असं एसबीआयच्या अहवालात म्हटलं आहे. काय आहे उपाय? कसं सावरायचं? कोरोनाविरुद्धचं हे युद्ध जिंकण्यासाठी स्थानिक पातळीवर करण्यात येणारे लॉकडाउन (Lockdown) आणि निर्बंध प्रभावी ठरत नसून, लसीकरण (corona Vaccination) हाच प्रभावी पर्याय दिसतो आहे, असंही अहवालात म्हटलं आहे. महाराष्ट्र आणि पंजाब या राज्यांसह अन्य राज्यांतली कोरोनाची सद्यस्थिती पाहिल्यानंतर याची कल्पना येते, असंही त्यात म्हटलं आहे. बिझनेस अॅक्टिव्हिटी इंडेक्स (Business Activity Index) अर्थात व्यापार क्रियाशीलता निर्देशांक गेल्या आठवड्यात कमी झाला असल्याचं निरीक्षण या अहवालात नोंदवण्यात आलं आहे. काही राज्यांनी लागू केलेलं लॉकडाउन किवा अन्य निर्बंध यांचे परिणाम पुढच्या महिन्यात पाहायला मिळतील, असा अंदाजही अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. Explainer : भारतात कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे दुसरी लाट आली आहे का? कोरोनाप्रतिबंधक लसीकरणाचा वेग वाढवणं हाच कोरोना महामारीशी लढण्याचा प्रभावी उपाय असल्याचं अहवालात म्हटलं आहे. सध्या दिवसाला 34 लाख जणांचं लसीकरण होत आहे. ती संख्या 40 ते 45 लाखांवर नेली, तर आतापासून चार महिन्यांत 45 वर्षांवरच्या सर्वांचं लसीकरण पूर्ण होऊ शकेल, असा अंदाज अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. काल देशात एका दिवसात 53 हजार 476 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. गेल्या पाच महिन्यांतला हा उच्चांक असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. नांदेडमध्ये कोरोनाचा कहर, अंत्यविधीसाठी मृतदेह वेटिंगवर देशातल्या 18 राज्यांत कोरोना विषाणूचा घातक डबल म्युटंट व्हॅरिएंट (Double Mutant Variant) आढळला असून, परदेशातल्या व्हॅरिएंट्सचा आढळ भारतातल्या रुग्णांमध्ये असल्याबद्दल गृहमंत्र्यांनी बुधवारी (24 मार्च) चिंता व्यक्त केली होती.
First published:

Tags: Coronavirus, Covid-19, SBI

पुढील बातम्या