Home » photogallery » lifestyle » MAHARASHTRA GOVERNMENT ISSUES GUIDELINES TO CELEBRATE HOLI HIGHEST CASES OF CORONAVIRUS NEW RULES OF SOCIAL DISTANCING MHAD
होळी साजरी करताय? हे नियम नक्की पाहा अन्यथा होऊ शकते मोठी कारवाई!
गेल्या वर्षीपासून कोरोनाने (Coronavirus in Maharashtra) सर्वत्र हाहाकार माजवला आहे. पुन्हा एकदा कोरोनाचा विस्फोट झाल्याने महाराष्ट्र शासनाने होळी आणि रंगपंचमी साजरी करण्यासाठी नव्या गाइडलाइन्स जारी केल्या आहेत.
|
1/ 11
गेल्यावर्षी पासून कोरोनाने सर्वत्र हाहाकार माजवला आहे. कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी शासनाने लॉकडाऊन करत घरीच थांबण्याचे आदेश गेल्यावर्षीपासून लागू केले होते.
2/ 11
त्याचबरोबर दक्षता म्हणून शासनाने गेल्यावर्षी कोणताही सार्वजनिक उत्सव किंवा सण साजरा न करण्याचे आदेशही दिले होते. त्यामुळे गेलीवर्षभर एकही उत्सव सार्वजनिक ठिकाणी साजरा करता आलेला नाही.
3/ 11
काही दिवसांपूर्वी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला पाहून शासनाने लॉकडाऊनची बंधने शिथिल केली होती.
4/ 11
मात्र पुन्हा एकदा कोरोनाचं संकट गडद झालेलं दिसत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक झालेला पाहायला मिळत आहे. आणि दुखद बाब म्हणजे सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रात आढळून येत आहेत.
5/ 11
त्यामुळे वाढत्या कोरोनाचा धोका लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने कठोर पावले उचलायला सुरुवात केली आहे.
6/ 11
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या गृहमंत्रालयाने एक परिपत्रक जाहीर केलं आहे. आणि त्यात होळी आणि रंगपंचमीसारखे सार्वजनिक सण अत्यंत साधेपणाने साजरे करण्याचे आदेश दिले आहेत.
7/ 11
होळीसारखा पारंपरिक सण महाराष्ट्रात खूप मोठ्या पद्धतीने साजरा केला जातो. मात्र कोरोनाचं संकट लक्षात घेऊन शासनाने गेल्यावर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा हा सण अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचे आदेश दिले आहेत. कोणत्याही प्रकारची गर्दी न करण्यास सक्ती केली आहे.
8/ 11
त्याचबरोर दरवर्षी रंगांची उधळण करून, पाणी टाकून, एकमेकांना रंग लावून साजरा केला जाणारा रंगपंचमी हा सण सुद्धा, सार्वजनिक ठिकाणी न जाता अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यास सांगण्यात आलं आहे.
9/ 11
होळी व रंगपंचमीनिमित्त कोकणात पालखीची मिरवणूक काढण्यात येते. मात्र यावर्षी पालखी घरोघरी न घेऊन जाता मंदिरातच ठेवण्यास सांगितलं आहे. त्याचबरोबर योग्य सामाजिक अंतर राखून दर्शनाची व्यवस्था करण्याचे आदेश स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत.
10/ 11
स्थानिक प्रशासनाने जर याआधी कडक निर्बंध लादले असतील तर ते लागू राहतील. किंवा आवश्यकतेनुसार अजून कडक निर्बंधही लागू करण्यात येतील.
11/ 11
त्यामुळे यावर्षी सुद्धा रंगपंचमी होळी सारखे उत्सव साजरे करताना नियमांचं पालन करणं आवश्यक आहे. अन्यथा शासनाकडून कठोर कारवाई केली जाणार आहे.