JOIN US
मराठी बातम्या / पुणे / आता 'मुळशी पॅटर्न' बस्स! नागरिकांच्या हातात बंदुकी देण्याचा पोलिसांनीच घेतला निर्णय

आता 'मुळशी पॅटर्न' बस्स! नागरिकांच्या हातात बंदुकी देण्याचा पोलिसांनीच घेतला निर्णय

खरंतर, अशा मस्तवाल गुन्हेगारांना वठणीवर आणण्यासाठी पोलिसी खाक्याच दाखवणं गरजेचं असतं. मात्र…

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 07 ऑक्टोबर : ‘पिंपरी चिंचवड शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी नागरिकांची मदत घेतली जाणार असून त्यांना चक्क बंदूक परवाना देण्याचा लोकाभिमुख निर्णय नवनियुक्त आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी घेतला आहे.  मात्र, कृष्ण प्रकाश यांच्या या निर्णयामुळे पिंपरी पोलीस दलाची दुबळी बाजू उघडी पडल्याची टीका होऊ लागली आहे. दगडांनी ठेचून खून करणारे, हातात शस्त्र घेऊन फिरणारे गुंड, वाहनांची तोडफोड करणारे गुंड, सराफा दुकान फोडणारे, ATM मशीन उखडून नेणारे आणि इतकंच काय तर कोरोनाची लागण होऊ नये म्हणून चक्क PPE किट घालून कुणाचीही भीती न बाळगता चोरी करणारे चोर, अशा घटनांनी पिंपरी चिंचवड शहरील गुन्हेगारीचा क्रूर चेहरा लॉकडाउननंतर समोर आला आहे. राज्यपाल नियुक्त सदस्य निवडीचा तिढा अखेर सुटला, नावांवर आज मंजुरीची शक्यता खरंतर, अशा मस्तवाल गुन्हेगारांना वठणीवर आणण्यासाठी पोलिसी खाक्याच दाखवणं गरजेचं असतं. मात्र, लोकांच्या हातात शस्त्र देऊन अशी गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठीचा अजब प्रयोग पिंपरीचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश करू पाहत आहे. विशेष म्हणजे, नागरिकांनीही या प्रयोगच स्वागत केले आहे. शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी नागरिकांची मदत घेतली जाणार असून त्यांना चक्क बंदूक परवाना देण्याचा निर्णय हा  कृष्ण प्रकाश यांनी घेतला आहे. पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! तब्बल 1 वर्ष रात्रीची विमान उड्डाणं असणार बंद पिंपरी चिंचवड शहरातील सुमारे 30 लाख लोकांच्या सुरक्षेची जबाबदारी  केवळ 3800 पोलिसांच्या खांद्यावर आहे. अर्थातच पोलीस कर्मचारी कमी असल्याने शहरातील गुन्हेगार मोकाट आहेत. मात्र, म्हणून नागरिकांच्या हाती शस्त्र देण्याचा प्रकाश यांचा प्रयोग पुन्हा टोळी संस्कृतीकडे नेणारा प्रकार असल्याची टीका माजी पोलीस अधिकारी सुरेश खोपडे यांनी केला आहे. पिंपरीतील गुन्हेगारी रोखण्यात पोलिसांना आत्तापर्यंत अपयश आलं हे तर स्पष्टच आहे. तेव्हा कृष्ण प्रकाश यांचा हा प्रयोग किती यशस्वी ठरतो हे बघावा लागणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या