राज्यपाल नियुक्त सदस्य निवडीचा तिढा अखेर सुटला, नावांवर आज मंजुरीची शक्यता

राज्यपाल नियुक्त सदस्य निवडीचा तिढा अखेर सुटला, नावांवर आज मंजुरीची शक्यता

राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्यांची 12 जागा रिक्त झाल्या आहेत. पण या जागी कुणाला पाठवायचा असा मोठा प्रश्न उपस्थितीत झाला होता.

  • Share this:

मुंबई, 07 ऑक्टोबर : महाराष्ट्रातील विधान परिषदेवरील राज्यपाल निर्देशित सदस्यांच्या 12 जागा रिकाम्या आहेत. मात्र, गेल्या सहा महिन्यांपासून याबद्दल कोणताही निर्णय झाला नाही. अखेर या मुद्दावर महाविकास आघाडी सरकारने तोडगा काढला आहे.  12 सदस्यांची नाव आज मंत्रिमंडळासमोर ठेवली जाणार आहे.

राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्यांची 12 जागा रिक्त झाल्या आहेत. पण या जागी कुणाला पाठवायचा असा मोठा प्रश्न उपस्थितीत झाला होता.  गेल्या सहा महिन्यांपासून राज्यपाल नियुक्त आमदारांचा तिढा कायम होता. अखेर या नावावर आता शिक्कामोर्तब झाल्याचे कळत आहे. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत ही नावं ठेवण्यात येण्याची शक्यता आहे.

मराठा आरक्षणासाठी साताऱ्यात पेटणार ठिणगी, उदयनराजेंच्या उपस्थितीत मोठा निर्णय

12 पैकी 9 आमदार महा विकासआघाडीच्या वाट्याला आले आहेत. तर उर्वरित 3 नावं नक्की कुणाची आहे, हे मात्र अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे. गेल्या 6 महिन्यांपासून याबाबतचा निर्णय हा प्रलंबित होता. आता या नावांवर चर्चा करून शिक्कामोर्तब केले जाईल आणि ही यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठवला जाईल.

चोरी करण्यासाठी ATM मध्ये घडवून आणला स्फोट, पण पैशांशिवायच केलं पलायन

कला, विज्ञान, सहकारी चळवळ आणि सामाजिक कार्य अशा क्षेत्रातील तज्ज्ञ किंवा प्रत्यक्ष कामाचा अनुभव असणाऱ्या व्यक्तींची राज्यपाल विधान परिषदेवर सदस्य म्हणून नियुक्त करू शकतात. त्यामुळे या 12 सदस्यांच्या निवडीचा अधिकार हा राज्यपालांना देण्यात आलेला आहे.

मंत्रिमंडळाने ज्या सदस्यांची नावांची राज्यपालांकडे शिफारस केली जातात, ती स्वीकारली जातात. परंतु, राज्यपाल आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये मध्यंतरी संबंध ताणले गेले होते. खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राज्यपाल निर्देशित उमेदवारी देण्याचा निर्णय हा प्रलंबित ठेवला होता. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने सुचवलेली 12 सदस्यांची नावं राज्यपाल तातडीने स्वीकारतील याबद्दल बराच वाद आहे.

Published by: sachin Salve
First published: October 7, 2020, 9:31 AM IST
Tags:

ताज्या बातम्या