Home /News /pune /

पुणेकरांनो लक्ष असू द्या! 'या' कारणामुळे वर्षभर करता येणार नाही रात्रीचा विमानप्रवास

पुणेकरांनो लक्ष असू द्या! 'या' कारणामुळे वर्षभर करता येणार नाही रात्रीचा विमानप्रवास

रात्री होणारी सर्व उड्डाणे आणि विमाने यांच्या वेळेत बदली केली जातील. त्यामुळे रात्रीची 10 विमान उड्डाणं आता सकाळी होणार आहेत.

    पुणे, 07 ऑक्टोबर : पुणे विमानतळावर (Pune Airport) रात्री होणारे विमानांचे उड्डाण (Operation of flights) एक वर्षासाठी बंद राहील. याचे कारण आहे, धावपट्टी दुरुस्तीचे आणि रस्ता बांधण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. पुणे विमानतळ संचालक कुलदीप सिंग यांनी सांगितले की, धावपट्टीवर रस्ता तयार करण्याचे काम 26 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. यासाठी एका वर्षाचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. हे काम रात्री केले जाईल, अशा परिस्थितीत धावपट्टीवरील विमानांचे कामकाज रात्री 8 ते सकाळी 8 च्या दरम्यान बंद केले जाईल. कुलदीप सिंग असेही म्हणाले की, उड्डाणांचे कामकाज सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेत सुरळीत पार पडेल. सिंग म्हणाले की, रात्री होणारी सर्व उड्डाणे आणि विमाने यांच्या वेळेत बदली केली जातील. त्यामुळे रात्रीची 10 विमान उड्डाणं आता सकाळी होणार आहेत. वाचा-चोरी करण्यासाठी ATM मध्ये घडवून आणला स्फोट, पण पैशांशिवायच केलं पलायन देशांतर्गत प्रवासात सप्टेंबरमध्ये सुधार सप्टेंबरमध्ये देशांतर्गत हवाई प्रवाश्यांची संख्या सुधारत आहे. मासिक आधारावर, ऑगस्टच्या तुलनेत यात 37 ते 39 टक्क्यांनी वाढ झाली आहे. रेटिंग एजन्सी इक्राच्या मते, वार्षिक आधारावर, सप्टेंबरमध्ये स्थानिक प्रवाशांची संख्या सुमारे 60 टक्क्यांनी घसरली आहे. आयसीआरएच्या म्हणण्यानुसार देशांतर्गत विमान कंपन्यांनीही आपली क्षमता वाढविली आहे. सप्टेंबरमध्ये कंपन्यांनी ऑगस्टमधील 33 टक्के तुलनेत सुमारे 46 टक्के क्षमतेसह काम केले. जूनमध्ये नागरी उड्डाण मंत्रालयाने कंपन्यांना त्यांची क्षमता 45 टक्क्यांनी वाढविण्याची परवानगी दिली. त्यानंतर 2 सप्टेंबर रोजी ते 60 टक्के करण्यात आले. या व्यतिरिक्त मंत्रालयाने ऑगस्टच्या उत्तरार्धात विमान कंपन्यांना आणखी अनेक सवलती जाहीर केल्या. यात प्रवाशांना प्रवासादरम्यान अन्न, पॅकेज केलेले खाद्य आणि पेये देण्याची आणि करमणूक सेवा देण्यासही परवानगी देण्यात आली. वाचा-पुणे हादरलं, नवले पुलाजवळ विचित्र अपघाताचा पहिला VIDEO 25 मेपासून देशांतर्गत उड्डाणं सुरू आयसीआरएचे उपाध्यक्ष किंजल शहा म्हणाले की, तालाबंदीनंतर जेव्हा 25 मेपासून देशांतर्गत उड्डाणे सुरू झाली, तेव्हा पहिल्याच दिवशी 416 उड्डाणे झाली. 28 सप्टेंबर रोजी ही संख्या वाढून 1,488 झाली. सप्टेंबरमध्ये, दिवसाला सरासरी 1,311 उड्डाणं होती. ऑगस्ट 2020 मध्ये दररोजच्या 930 फ्लाइटपेक्षा हे चांगले आहे मात्र सप्टेंबर 2019 मध्ये दररोजच्या सरासरी उड्डाणे 2,874 च्या तुलनेत कमी आहेत.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Pune, Pune airport

    पुढील बातम्या